Ticker

6/recent/ticker-posts

डिस्कळ येथे जिल्हा परिषद सदस्या सौ लता कर्णे यांचे विरुद्ध दि. १२ एप्रिल रोजी निषेध मेळावा झाला

 






पुसेगाव दि . [प्रतिनिधी ]

 डिस्कळ येथे जिल्हा परिषद सदस्या   सौ लता कर्णे यांचे विरुद्ध दि. १२ एप्रिल रोजी  निषेध मेळावा झाला  त्यावेळी आ. शशिकांत शिंदे  यांनी माझ्यावर , पाडुरंग गोडसे, उदय शिंदे यांचेवर १० कोटी मधील काही रक्कम  घेतलेचा आरोप केला. हा आरोप पूर्णतः चुकीचा व खोडसाळपणाचा असून सदर आरोप शिंदेसाहेबांनी सिद्ध केल्यास आम्ही राजकीय संन्यास घेऊ व  केलेला आरोप सिद्ध न झाल्यास साहेबांनी जाहीर सभेमध्ये केलेला आरोप मागे घ्यावा , असे आवाहन डिस्कळचे माजी सरपंच डॉ . महेश पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे .                          

 डॉ . पवार पुढे म्हणाले की , गेली पंधरा वर्षे आम्ही साहेबांवरती जे प्रेम केले व त्यांनी जे आम्हाला प्रेम दिले . जावली मतदार संघ गेल्यानंतर साहेबांनी कोरेगांव मतदार संघात यावे म्हणून त्यांचा कोरेगांव मतदार संघात पहिला जाहीर कार्यक्रम हा आम्हीच डिस्कळमध्ये घेतला होता. तसेच २०१९ मध्ये विधानसभेला अपयश आल्यानंतर त्यांर साहेबांना विधानपरिषद ‌वर संधी मिळावी यासाठी पहिले मागणीचे पत्र   राष्ट्रीय अध्यक्ष  शरदचंद्र पवार यांचेकडे आम्ही स्वतः . जाऊन सुुपुर्त केले होते.

कोरेगाव मनदारसंघात शिंदेसाहेब आल्यापासून सलग चार विधानसभा व एकवेळ लोकसभा निवडणूकीत  साहेबासाठी डिस्कळ पंचक्रोशीत जिवाचे रान केले . यापैकी एकाही निवडणूकीत आम्ही साहेबांच्या एका रुपयाला सुद्धा मिंधे नाही. प्रसंगी प्रत्येकवेळी पदरमोड करून आम्ही साहेबांचा प्रचार केला , याची सुद्धा जाणीव साहेबांना आजही आहे . परंतू डिस्कळमधीलच दोन कार्यकर्ते यांनी आमच्या बद्दल गैरसमज करून दिल्यामुळे साहेबांनी आमच्यावर आरोप केले. त्यामुळे आम्ही फार व्यधित झालो .                   साहेबांनी ज्या दोन कार्यकर्त्याचे ऐकून आरोप केले त्यापैकी एक दत्ता गोडसे याची राजकीय विश्वासहर्ता पूर्ण डिस्कळ पंचक्रोशीला  माहीत आहे. व दत्ता गोडसे यांने एकदाही शिदे साहेबांना मतदान केलेले नाही असा हा कमिशनखोर दत्ता गोडसेचे ऐकून साहेबांनी आरोप करावेत, ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे .  राजू शिपटे यांनी आमच्याविषयी बोलताना आपली उंची तपासावी अन्यथा आम्हाला बाहेर तुमचा इतिहास बाहेर काढावा लागेल. 

जि.प बुध गटातून सौ. लता कर्णे विजयी झाल्या . त्यांनी भाजपबरोबर यावे ,यासाठीचा पहिला प्रयत्न अथवा दबाव  हा राजापूर मध्ये झाला . त्यावेळीसुद्धा  आम्हीच ठामपणे दबाव झुगारून लावला. त्याचे मानाजीकाका घाडगे व राजूबापू पाटील हे साक्षीदार आहेत .त्यानंतर खटाव येथील कार्यक्रमानंतर सुध्दा पुनश्च दबाव टाकून  घेवून जाणेचा प्रयत्न झाला . तिथेही आम्हीचं पुढे होवून दबाव झुगारून लावला, ही वस्तूस्थिती अहि. सदर प्रकार माजी आमदार  प्रभाकर घार्गे व प्रदिप विधाते यांच्यासमोर झालेला आहे.

त्यानंतर पुन्हा गटनेता निवडीवेळी सातारा येथील  हॉटेल प्रीती येथे पुन्हा असाच प्रकार घडला. असे तीनदा घडूनसुध्दा लता कर्णे यांना आम्ही साताऱ्यात नेत्यांच्या ताफ्यात दिल . सौ लता कर्णे यांचे वरती भाजपला सहकार्य करावे असा जो कायम दबाव येत होता . त्याची आम्ही वेळोवेळी आम्ही वरिष्ठांना कल्पना देत होते. भाजपला सहकार्य करण्याची आमची कोणाचीही  मानसिकता नव्हती .शिंदे साहेबांनी जे आरोप आमचेवर  केलेले आहेत . ते निराधार व पूर्णपणे चुकीचे आहेत याविषयी आम्ही   आमच्या कार्यकत्यासोबत दि . २८ एप्रिलनंतर चर्चा करुन पुढील राजकीय वाटचालीचा  निर्णय घेणार आहोत.

पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही आमच्या गटाच्यावतीने पूर्ण ताकतीने लढणार आहोत असेही त्यांनी सांगितले .