संतोष फुलारी @ भेंडा बु // ग्रामीण प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बु. येथे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री स्व. वैकुंठवासी सरस्वतीबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९१) यांना ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
यावेळी भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा मंदिरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले, अंकुश महाराज कादे, दत्तात्रय काळे,साहेबराव गव्हाणे, कुंडलिक महाराज गोरे, गणेशदेवा कुलकर्णी, अशोकराव मिसाळ, बापूसाहेब नजन, सुखदेव फुलारी, वाल्मीक लिंगायत, सुनील गव्हाणे, अंबादास गोडे, , डॉ. संतोष फुलारी, ॲड. रवींद्र गव्हाणे, संजय मनवेलीकर, अजित रसाळ, शिक्षक श्री. गवळी, बाबासाहेब भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी स्व. सरस्वतीबाई पेसोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या साध्या, धार्मिक आणि समाजाभिमुख जीवनाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची आठवण काढण्यात आली. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक आदर्श व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





Social Plugin