Ticker

6/recent/ticker-posts

मुलांना मोबाईलचे व्यसन लागण्याआधीच व्हा सावध - शिक्षणतज्ञ सचिन जोशी



ग्रामीण / प्रतिनिधी - विश्वराज वाकोडे 

        मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांमध्ये एकाग्रता कमी होणे, झोपेच्या समस्या, चिडचिडेपणा व सामाजिक वेगळेपणा वाढत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समितीचे सदस्य शिक्षणतज्ञ सचिन जोशी यांनी केले.

लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल व मुक्ताई विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्क्रीनकडून स्किलकडे' या विषयावर मंगळवारी सुरमणी प्रा. दत्ता चौगुले सभागृहात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. "आजची ६५ टक्के मुलं भविष्यात अशा क्षेत्रात करिअर करतील, जी आज अस्तित्वातही नाहीत. त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर कौशल्य विकास आवश्यक आहे," असे जोशी म्हणाले.

मुलांना वेळेचे नियोजन शिकवणे, नियमित संवाद साधणे आणि मोबाईल केवळ साधन म्हणून वापरणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षण अधिकारी तानाजी भोसले होते.