प्रतिनिधी : विजय गायकवाड
रिसोड : येथील स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व विभागप्रमुख प्रा डॉ विजय आर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पुस्तक दिवस व कॉपीराईट दिवस प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांना पुस्तक भेट देऊन साजरा करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ गायकवाड यांनी "हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे 1995 मध्ये, UNESCO ने निर्णय घेतला की जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जाईल, कारण ही तारीख विल्यम शेक्सपियर, इंका गार्सिलासो दे ला वेगा यांच्या तसेच इतर अनेक प्रमुख लेखकांच्या जन्म किंवा मृत्यूची तारीख असल्यामुळे या दिवशीचे एक वेगळे महत्व आहे. या थोर लेखक विचारवंत यांच्या प्रेरणेने वाचन करण्यास चालना मिळते."
तर विभागप्रमुख प्रा डॉ गायकवाड यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले की "यादिवशी विद्यार्थ्यांनी स्वतः पुस्तकाचे वाचन करणे, नवीन पुस्तक खरेदी करणे, पुस्तके एकमेकांना भेट देणे, ग्रंथालयाला भेट देणे, आपल्याकडे जुनी पुस्तके असतील तर ती गरजूंना दान करणे असे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी राबवू शकतात. कारण या उपक्रमामुळे पुस्तकांचा सन्मान राखला जातो व आपोआपच वाचन संस्कृती वृद्धिंगत होते व जोपासल्या जाते. असे ते म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाला प्रा डॉ आदिनाथ बदर, प्रा डॉ करुणाकरन रंजळकर, श्री संतोष शेरे, प्रा डॉ अमोल अढाव, प्रा डॉ पल्लवी देशमुख, प्रा डॉ छाया खिल्लारे, प्रा डॉ अमरदिप जाधव, प्रा डॉ रवी खाडे, प्रा निखिल उंबरकर, प्रा डॉ जितेंद्र बोरसे, प्रा भूषण सावळे, प्रा डॉ प्रमोद फाटक, प्रा तुळशीराम भोयर, प्रा ज्योतीपाल खडसे, प्रा डॉ आम्रपाली भगत, कु छाया खरबळ, श्री गजानन बोरुडे, श्री जगदीश बोडखे सहित कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु वैष्णवी कैलास पांढरे, प्रस्तावना कु. नाजीया मुस्ताक देशमुख तर आभार विठ्ठल कैलास कानडे या विद्यार्थ्याने केले.





Social Plugin