पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घेराव, टेबलावर वाळके ऊस फेकले , शिवसैनिक आक्रमक
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
शेतकरी सेनाच्या वतीने प्रताप जाधव यांचे नेतृत्वाखाली पाटबंधारे विभाग कार्यालय खटाव येथे येरळा नदीस पाणी सुटावे या मागणीसाठी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालण्यात आला . यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव , मुगुटराव कदम ,असलम शिकलगार, शंकर लावंड ,महिला आघाडीच्या अनिता काळे , समीर मोहिते ,बबन काळे, युवराज जाधव ,समाधान गोडसे शिवसैनिक उपस्थित होते .पाटबंधारे विभागाच्या कारभाराच्या निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव म्हणाले ,ही योजना ज्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती तो म्हणजे येरळा नदी कायम वाहती राहावी . गेले चार ते पाच महिने झाले नदी पूर्ण कोरडी पडली असून किमान अडीच हजार हेक्टर क्षेत्र या नदी व कॅनॉल खाली ओलिताखाली येते .
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या शेतात उसाची व बागायत पिकांची लागण केली ,परंतु दोन्ही लोकप्रतिनिधींच्या उदासीनता व पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून शेतीमालाला भाव नाही व लागण केलेले पीक ही करपून जात आहे अशी अवस्था आहे .विधानसभा मतदारसंघात दोन आमदार असून सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्यासाठी वेळ नाही याबद्दल खंत वाटते . जीहे कटापूर योजना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली . हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा व येथील शेतकरी उज्वलतेकडे जावा हे स्वप्न साहेबांचे होते .ते पूर्णत्वास गेले परंतु एक भाग तुपाशी एक भाग उपाशी असे का? येत्या दोन दिवसात संबंधित विभागाने योग्य ती भूमिका घ्यावी अन्यथा शिवसेना रस्त्या उतरून आंदोलन करणार असल्याला इशारा यावेळी दिला .
.jpg)




Social Plugin