Ticker

6/recent/ticker-posts

राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगावचा एसएससी मार्च 2026 परीक्षेचा 100% निकाल






बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा एस.एस.सी. मार्च 2026 परीक्षेचा निकाल नेत्रदीपक लागला असून शाळा स्थापनेपासून ते आज अखेर शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. लीड अभ्यासक्रमामध्ये खटाव तालुक्यामध्ये ही एकमेव शाळा आहे. सर्व क्लासरूम डिजिटल पद्धतीने आहेत. या शाळेने वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांचा विश्वास संपादन केला आहे .

इयत्ता दहावी मार्च 2026 परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी पुढील प्रमाणे 1) सई भीमराव फडतरे 97.20%  2) संस्कृती सुधीर गायकवाड 96.60% 3) तन्वी तुषार जगदाळे 94.20% या शाळेचे सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क  यश  संपादन केले आहे. शाळेचा निकाल 100% लागलेला असून  ही परंपरा स्थापनेपासून  कायम चालू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाने ही शाळा स्थापन केली.  या शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम, विविध स्पर्धा परीक्षा, संस्थेमार्फत विविध व्याख्याने ,चर्चासत्रे ,कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या विकासाला चालना दिली जात आहे. 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव , उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव ,सचिव श्री मोहनराव जाधव ,खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव आणि सर्व संस्था विश्वस्त व पदाधिकारी, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के. डी. पवार सर , एस आर पाटील सर , जयंत अण्णा सर तसेच डॉ.  राधाकृष्णन इंग्लिश मीडियम चे स्कूल चे प्रशासकीय अधिकारी श्री डी. पी.शिंदे सर , मुख्याध्यापिका कुमारी धनश्री पोतदार , पर्यवेक्षक  सागर ठोंबरे सर,  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पुसेगाव व  पुसेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ , पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्था आपल्या दारी या  उपक्रमांतर्गत  संस्थेचे  सर्व पदाधिकारी,सर्व शाखेचे मुख्याध्यापक यांनी प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे घरी जाऊन अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक आजी-माजी विद्यार्थी संघ, पुसेगाव व पुसेगाव पंचक्रोशी ग्रामस्थ  या सर्वांनी अभिनंदन करून  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.