Ticker

6/recent/ticker-posts

भूम, तालुक्यास अवकाळीचा तडाखा



आसिफ शेख @ तालुका प्रतिनिधी 

14 मे 26 भूम 

भूम : धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात बुधवारी (दि.१३) वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या या वादळी पावसात अनेक ठिकाणी फळबागांसह जनावराच्या चाऱ्याचे नुकसान झाले असून कांही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. भूम तालुक्यातील सुकटा येथे वीज अंगावर कोसळून म्हैस दगावली आहे.  

भूम  तालुक्यातील अनेक भागात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामध्ये विजांचे तांडव दिसून आले. यामध्ये सुकटा व परिसरातही वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये शेतकरी सुभाष संदीपान पांढरे यांची म्हैस वीज अंगावर पडल्याने जागीच मृत्युमुखी पडली. तहसीलदार जयवंत पाटील यांनी तात्काळ सूचना देताच कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले .

     म्हैसही दगावल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पावसाने शेतकऱ्याच्य शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीच्या कडब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंब्यासह इतर फळबागांचे नुकसान झाले. या वादळी पावसाने मोठी झाडे उन्मळून पडली. उसाच्या पिकासाठी मात्र हा पाऊस मोठा आधार ठरला आहे. भूम ते वालवड हा चिंचपूर ढगे मार्गे जाणारा रस्ता झाड रस्त्यावर पडल्याने काही काळ बंद होता. बाजार समितीचे संचालक विशाल ढगे यांनी तातडीने काही युवकांना सोबत घेऊन सदरील झाड बाजला काढत वाहतक