मन्सूर शहा.बुलडाणा:---- 12 मे 2026
MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे आयोजित राज्यस्तरीय "आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" सोहळ्यात अकिल हसन तांबोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा श्री साईबाबा सांस्कृतिक भवन शिर्डी येथे 12 मे 2026 रोजी मंगळवारला मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले उपस्थित होत्या, तर सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. सुप्रसिद्ध कवी रोहित शिंगे होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे व सचिव कोळी सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अकिल हसन तांबोळी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्दू हायस्कूल सिंदखेडराजा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून "Akil Tamboli Sir Classes" या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती देत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा कुटुंबासमवेत गौरव करण्यात आला.






Social Plugin