Ticker

6/recent/ticker-posts

उद्याची बकरी ईद मोठ्या उत्साहामध्ये आनंदाने व शांततेत साजरी करावी-सपोनि नागनाथ खुणे.

 





बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे  ] 

२८ रोजी होणारी ईद ईदुल-अजहा शांततेत साजरी करावी ,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठलीही अडचण निर्माण झाल्यास पोलीसाची संपर्क साधावा सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि नागनाथ खुणे यांनी केले. 

वर्धनगड ता . खटाव या ठिकाणी 28 रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्त आयोजित मुस्लिम समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. 

 सपोनि नागनाथ खुणे यांनी बोलताना पुढे सांगितले ईद मोठ्या आनंदाने साजरी करा ईद साजरी करताना आपल्याकडून कोणाच्या भावना दुखावू नये असे कृत्य होऊ देऊ नये, आणि कोणी आपणाला त्रास देत असेल तर कायदा हातात न घेता थेट पोलीस स्टेशनची संपर्क साधावा त्याचा बंदोबस्त केला जाईल, या गावांमध्ये जातीय सलोखा अबाधित रहावा यासाठी एकत्रित जातीपातीच्या पलीकडे जाऊन ईद साजरी करावी एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात,

काही समाजकंटक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्तीने काही खोडसाळ कृत्य केल्यास कोणीही कायदा हातात न घेता  तात्काळ, पोलिसाची संपर्क साधण्याचे विशेष आवाहन केले.

यावेळी ॲड. जावेद शिकलगार आणि ईद व कुर्बानी विषयी महत्व सांगून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने व शांततेने ईद साजरी होईल अशी ग्वाही दिली. व उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी वर्धनगड येथील प्रमुख मुस्लिम बांधव उपस्थित होते.