प्रतिनिधी : कैलास कोल्हे
गुरुपिंपरी : “जीवनात खरा आनंद मिळवता आला पाहिजे. मन शांत, समाधानी आणि सकारात्मक असेल तरच जीवन सुखी होते. माणसाचे मन हेच सर्व गोष्टीला कारण असते,” असे प्रतिपादन प. पू. सुदामराज बाबा शास्त्री यांनी केले.
गुरुपिंपरी येथे श्री रामेश्वर गंगाधर पाटील कोल्हे यांच्या वस्तू शांती व गृहप्रवेश निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथेदरम्यान ते बोलत होते. धार्मिक व भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या भागवत कथेस परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
कथेदरम्यान प. पू. सुदामराज बाबा शास्त्री यांनी अध्यात्म, संस्कार, मनाची शुद्धता, चांगले विचार आणि मानवतेचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले. “मन सकारात्मक ठेवले तर प्रत्येक संकटावर मात करता येते आणि जीवनात आनंद प्राप्त होतो,” असेही त्यांनी सांगितले.
भागवत कथा ऐकण्यासाठी महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला असून दररोज रात्री उशिरापर्यंत भाविक कथा श्रवणाचा लाभ घेत आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून उपस्थित भाविकांनी कथा, भजन व कीर्तनाचा मनमुराद आनंद घेतला. धार्मिक वातावरणामुळे गुरुपिंपरी परिसरात भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
.jpg)




Social Plugin