;* प्रदीप विधाते ; शेतकऱ्यांसाठी कर्जवाटपाचा शुभारंभ *
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव आणि परिसरातील शेतकऱ्यांचे हित ध्यानात घेऊनच श्री पिंपळेश्वर विकास सोसायटी , हुसेनपूर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध करुन देणे आणि कृषी विभागाचे सर्व लाभ लाभार्थी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सोसायटीचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध असल्याने ही संस्था अल्पावधीत प्रगतीपथावर जाईल असा विश्वास जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी व्यक्त केला.
पिंपळेश्वर सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना कर्जवाटप शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खटाव - माण ॲग्रो प्रोसेसिंगचे संचालक राहुल पाटील, अशोकराव कुदळे, विभागीय अधिकारी घनश्याम सावंत, विक्री अधिकारी सागर चव्हाण, घाटगे, खटाव शाखाप्रमुख मोहसिन मुल्ला,चेअरमन रसुलभाई मुल्ला, शीतल झिरपे, सोसायटीचे सर्व संचालक, पिंपळेश्वर संघटना तसेच जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सोसायटीच्या सभासदांना कर्जवाटप करण्यात आले.
छायाचित्र - खटाव येथे श्री पिंपळेश्वर विकास सोसायटीच्या सभासदांसाठी कर्जवाटपाचा शुभारंभ काताना मान्यवर . छाया - प्रकाश राजेघाटगे बुध





Social Plugin