मन्सूर शहा. धोत्रा. भ.:---
चिखली प्रतिनिधी - आदरणीय कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेल्या मुंगसाजी महाराज एज्युकेशन सोसायटीची पहिली शैक्षणिक संस्था असलेल्या 'तक्षशिला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, चिखली'ने HSC परीक्षेत यशाचा नवा इतिहास रचला आहे. त्यामध्ये
वर्ग १२ वी सायन्स चा निकाल १००% लागला असून
वर्ग १२ वी आर्टस् चा निकाल ९६.७७% लागला आहे त्यासाठी सर्व
संस्था चालक, प्राचार्य व स्टाफने चांगलीच मेहनत घेतल्यामुळे
मुंगसाजी महाराज एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष, मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे , जितेंद्र दादा बोंद्रे,संपूर्ण संचालक मंडळ आणि आदरणीय प्राचार्य विजय लहाने व सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! प्राचार्यांचे कुशल नेतृत्व आणि सर्व गुरुजनांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम, यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे सुवर्णयश संपादन करता आले आहे. ज्ञानदानाचा हा पवित्र यज्ञ असाच अखंड तेवत राहो, हीच सदिच्छा.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुराधा परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन🎊 विज्ञान शाखेतील
सुदेशना वीर (88.17%), राधिका खेडेकर (88%), अमृता खेडेकर (86.17%), भक्ती कोल्हे (85.67%) यांच्यासह तसेच कला शाखेतील आशियाबी बिलाल शहा (74.73%), राबियाबी शाईन शहा(73.33%) मोईन शहा सत्तार शहा (71.17%) या उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक कौतुक! तुमची जिद्द आणि पालकांचे स्वप्न आज या निकालाच्या रूपाने सत्यात उतरले आहे.
तक्षशिला परिवाराच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी अनंत शुभेच्छा.!!





Social Plugin