छायाचित्र =छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव पोलिसांचा रूट मार्च
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुसेगाव , वर्धनगड तसेच खटाव येथे पोलिसांचे संचलन
बुध , दि. २७ (प्रकाश राजेघाटगे) : बकरी ईदचा सण मुस्लिम बांधवांनी शांततेत व उत्साहात साजरा करावा. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुसेगाव पोलिसांनी पुसेगाव ,वर्धनगड, खटाव येथे पथ संचलन केले.
मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण गुरुवारी (दि. २८) साजरा होत आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी पुसेगाव बाजारपेठ, खटाव गावआणि वर्धनगड येथे रूट मार्च काढून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, १७ पोलीस अंमलदार व २६ होमगार्ड, पोलीस मुख्यालयातील २० पोलीस अंमलदार , त्यामध्ये १०अंजारी सुठ परिधान करून पथ संचलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करताना, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा इशारा दिला. सामाजिक सलोखा राखून बकरी ईद सण उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व कोरेगावच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांच्या आदेशानुसार हे पथ संचलन करण्यात आले.





Social Plugin