भाग्यश्री धकाते उमरेड
ग्रामीण न्यूज प्रतिनिधी
उमरेड
उमरेड येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी विधानसभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपविभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीत विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला.
योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामांची प्रगती, प्रलंबित बाबी आणि निधी संदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच गुणवत्तेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या या योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्याचा निर्धार या वेळी माननीय आमदार संजय मेश्राम यांनी व्यक्त करण्यात केला.






Social Plugin