Ticker

6/recent/ticker-posts

 आ. भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन


डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 



कारंजा शिवसेना पक्ष नेत्या तथा विधान परिषद आमदार भावनाताई पुंडलिकराव गवळी पाटील यांच्या हस्ते आज कारंजा लाड येथे त्यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे फित कापून थाटात उद्घाटन करण्यात आले.


यावेळी ताईसाहेबांनी उपस्थित शिवसैनिक, पदाधिकारी वतीने नागरिकांशी संवाद साधताना काय सांगितले की, 'हे कार्यालय म्हणजे न कारंजा लाड मतदार संघातील या प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्याचे मंदिर आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत जनतेची कोणतीही कामे येथे प्राधान्याने केली जातील.' या


उद्घाटन सोहळ्यास शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली ताई येळणे, दिलीप भाऊ भोजराज, ओबीसी सेल तालुका प्रमुख अमोल पाटील भिंगारे, शहरप्रमुख अरुण बिकड, तालुका संघटक अतुल भाऊ दरेकर,

शहर संघटक अॅड संदेश जिंतूरकर, युवासेना विधानसभा प्रमुख अजय दादा मते, युवासेना उपजिल्हाप्रमुख चैतन्य वक्ते उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील तुरक, युवासेना तालुका प्रमुख अमोल गाडे, गणेश भाऊ श्रीराव, क्षमानंद निमगडे, युवासेना.

उपतालुकाप्रमुख सागर मुंदे, संतोष आप्पा परसवर, धनज सर्कल संदीप पाटील टेकाडे, काजळेश्वर सर्कल प्रमुख संदीप पाटील लाहे, पोहा सर्कल प्रमुख बबन भाऊ वरगट, धामणी सर्कल प्रमुख संदीप सरस्कर, उपसर्कल प्रमुख विलास बुधे, राजेश पाटील कडू, नंदकिशोर मुंदे, दिंगबर एकनार, ज्ञानदेव ताटे, गोविंद मुंदे, ईश्वर ठाकरे, मंगेश मुंदे महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फित कापताच 'भावनाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.