गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
शिवसेना पक्ष नेत्या तथा विधानपरिषद आमदार *सन्माननीय भावनाताई पुंडलिकराव गवळी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज येथील शासकीय विश्राम गृहात मोठ्या उत्साहात व शिवसेनेच्या पारंपरिक जल्लोषात संपन्न झाला.
शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे यांच्या आयोजनाखाली झालेल्या या सोहळ्यास ताईसाहेब *स्वतः उपस्थित राहिल्या. यावेळी कारंजा तालुक्यातील दिलीप भाऊ भोजराज, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली ताई येळणे, ओबीसी सेल तालुका प्रमुख अमोल पाटील भिंगारे, तालुका संघटक अतुल पाटील दरेकर, शहर प्रमुख अरुण बीकड, शहर संघटक, ॲड संदेश जिंतूरकर,डॉ. रमेश चंदनशिव राजू भाऊ अवताडे, सरपंच सुरेश पाटील दवंडे, अशोक पाटील टाके, प्रमोद साटोटे, गजानन पाटील लाहे, चांद भाई गारवे, व ताईसाहेब यांना मानणारे शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व नागरिकांनी ताईसाहेबांना पुष्पगुच्छ देऊन, शाल-श्रीफळ अर्पण करून अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना आ. भावनाताई गवळी म्हणाल्या, *"कारंजा लाडची जनता माझं कुटुंब आहे. तुमच्या प्रेम व आशीर्वादामुळेच मी आज इथवर पोहोचले. कारंजा तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. हे प्रेम असंच राहू द्या."
कार्यक्रमास शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व शेकडो शिवसैनिक भगवे उपरणे परिधान करून उपस्थित होते. *"भावनाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" व *"शिवसेना जिंदाबाद च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.





Social Plugin