देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के महाराष्ट्र ग्रामीण न्युज
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना सावधानता बाळगावी कारण सध्या हवामानात बदल झाले असून वादळी पावसाचे संकेत दिसत आहेत. कारण हा सीझन शालेय सुट्टी व कॉलेजला सुट्टी व विश्रांतीचा महिना असल्याने अनेक लोक सुट्टीच्या निमित्ताने पर्यटक कोकणात समुद्राच्या ठिकाणी जास्त फिरायला जातात तेव्हा ते पर्यटक असे दिसण्यात आलेले आहेत निष्काळजीपणा हा त्यांचा अंगगुण झालेला आहे असे दिसण्यात आलेले आहे. जे कोणी पर्यटक कोकणामध्ये समुद्र फिरायला येतात ते अत्यंत निष्काळजीपणाने समुद्रामध्ये वावरतात कोणाचाही स्थानिक ग्रामस्थानांचं मार्गदर्शन घेत नाही याचे कारण असे झालेले आहे की सध्या मीठ मुंब्री येथे चार पर्यटक बुडालेले अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना दिसले त्यातील एक पर्यटक वाहून गेलेला आहे. तो अद्याप सापडलेला नाही त्यातले तीन जण जिवंत अवस्थेत स्थानिक ग्रामस्थानांनी बोटीच्या सहाय्याने त्यांना वाचवण्यात यश आलेले आहे.
हे चारी तरुण नायगाव येथे राहणारे मुंबई येथील आहेत. असे हे पर्यटक अत्यंत बेजबाबदारपणे व निष्काळजीपणाने समुद्रामध्ये पोहायला जातात व स्थानिक ग्रामस्थानांचं मार्गदर्शन न घेता समुद्रामध्ये मस्ती करतात परिणामी यांचीही मस्ती शेवटी जीवावर बेतली जाते म्हणून कुठचाही पर्यटक समुद्रात जाताना सावधानतेने समुद्रामध्ये जावे त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ गायडन्स यांचे मार्गदर्शन घ्यावे लाईफ जॅकेट यांचा वापर करावा स्थानिक सागर रक्षक दल सदस्य आहेत यांचे मार्गदर्शन घ्यावे की जेणेकरून आपला जीव समुद्रामध्ये धोक्यात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. काही कोकणामध्ये पर्यटक जे गाड्या घेऊन येतात ते सुद्धा ड्रायव्हिंग करताना बेजबाबदारपणे दिसण्यात आलेले आहेत.गाड्या बेफाम व सुसाट या वेगाने ते पळवताना दिसलेले आहेत परिणामी अपघात होण्याची शक्यता कोकणामध्ये जास्त वाढलेली आहे. शिवाय कोकणामध्ये ट्रॅफिक हवालदार कमी असल्यामुळे मद्यपान करून करून सुद्धा ड्रायव्हिंग केली जाते सुसाट पद्धतीने गाडी चालवणारे हे बाहेरचे मुंबईचे ड्रायव्हर परिणामी अपघात होणाऱ्या अवस्थेत दिसले गेलेले आहेत. तेव्हा प्रत्येक येणाऱ्या कोकणामधील पर्यटकांनी सावधानता ही समुद्रात सुद्धा व गाडी चालवताना सुद्धा बाळगावी की जेणेकरून अपघात होणार नाही व आपल्या जीवावर काही बेतनार नाही याची खबरदारी घ्यावी.
याशिवाय पावसाळी वातावरण असल्यामुळे विजा पडण्याचे प्रमाण सुद्धा सुरुवातीच्या आठवड्याभरात जास्त कोकणामध्ये असते अशा परिस्थितीत सुद्धा काही पर्यटक विजयाची सेल्फी काढण्यात दंग झालेले दिसलेले आहेत तेव्हा विजा जेव्हा कडकडतात तेव्हा पर्यटकांनी घराच्या बाहेर न पडता मोबाईलवर सेल्फी न काढता आपला जीव सुरक्षित कसा राहील याची काळजी घ्यावी. कोकणात समुद्रात जाणारे पर्यटन हे बुडतात हे काही नवीन बाब नाही आहे. पर्यटक हे निष्काळजीपणाने समुद्रामध्ये जातात व आपला जीव धोक्यात घालतात असे दिसण्यात आलेले आहे. तेव्हा प्रत्येक पर्यटकांनी कोकणातील समुद्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी जाताना आपल्या जीवाची काळजी व आपण कुठल्याही गोष्टीला बेज जबाबदार राहणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी ही येथील ग्रामस्थांची नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे कोकणातील महाराष्ट्र पोलीस, सागर रक्षक दल, कोस्टल गार्ड, कस्टम, नेव्ही सर्व्हिसेस, जीव रक्षक दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, महिला बचत दल, ग्रामरक्षक दल, पोलीस मित्र,यांचे पर्यटकांनी मार्गदर्शन घेण्यात यावे की जेणेकरून पर्यटकांना योग्य ते मार्गदर्शन होईल.





Social Plugin