बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास आणि उच्च पदावर बसण्यासाठी केलेले सहकार्य याची जाणीव ठेवून जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे .त्यासाठीच जनतेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत आ. महेशदादा शिंदे यांनी व्यक्त केले.
दरजाई (ता. खटाव) येथे दरजाई- निढळ या साडे चार कोटी रुपयेचा मंजूर झालेल्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्ता शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, कार्यकारी उपसभापती शिवाजी शेडगे, प. स. सदस्य शशिकांत रोमण, हणमंत बोटे, नवनाथ वलेकर, कॅप्टन आनंदराव लावंड, अंकुश पवार, रोहित लावंड, दत्तात्रय बोटेपाटील, संतोष बोटे- पाटील, राजाराम बोटे, इरफान शिकलगार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. शिंदे म्हणाले की, दरूज दरजाई निढळ परिसरातील सर्व वाडीवस्तीवरील वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिकांना रस्त्या बरोबर पिण्याचे पाणी व शेतीला लागणारे पाणी प्रश्न भेडसावत होता. यापैकी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला असून पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्याही पाण्याचा प्रश्न काही दिवसताच मार्गी लावणार असून दरजाई तलाव हा पूर्ण उन्हाळाभर भरून राहिल अशी ग्वाही दिली. डॉ प्रियाताई शिंदे म्हणाल्या की, या परिसरातील ज्या काही अडीअडचणी असतील त्या आपल्या आमदार साहेबांच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविल्या जातील असे सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व महिलांच्या हस्ते रस्ताच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक शामराव बोटे यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर लावंड यांनी केले तर सतिश बोटे पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास भानुदास बोटे, प्रकाश बोटे, जनार्दन बोटे, सुरेश बोटे, मोहन पाटोळे, राजेंद्र शिंदे, महादेव शिंदे, रामभाऊ ढोणकर, विजय पाटोळे, तानाजी पाटोळे, अनुसया यादव, सविता यादव, मनिषा यादव, शितल यादव, अजिता यादव, संगिता यादव, कोमल यादव, मिनाक्षी मसगुडे, मिरा यादव, तनुजा यादव, विष्णू खामकर, महेश शिंदे, सुनिल यादव, नानासो खामकर, जोतीराम यादव, सागर शिंदे, पोपट यादव, बापू खामकर, किरण यादव, अर्जून शिंदे, महिपती पाटोळे, चंद्रकात बोटे, प्रकाश पाटोळे, एकनाथ पाटोळे, सतिश यादव आदिंसह बोटेपाटील वस्ती, शिंदेवस्ती, यादववस्ती आणि खामकर वस्तीवरील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होता.
छायाचित्र दरजाई: येथिल रस्ता भूमिपूजन प्रसंगी आ. महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. प्रियाताई शिंदे व इतर मान्यवर छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
.jpg)




Social Plugin