Ticker

6/recent/ticker-posts

अजिंक्य सोशल फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

 



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

अजिंक्य सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. समाजसेवा, शिक्षण, कला आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना याप्रसंगी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून *ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज मोरे* (जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज) उपस्थित होते. त्यांच्यासोबतच डॉ. राजेंद्र मोरे सर, श्री. सोनावणे सर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ॲड. श्री. विनायक दादा गायकवाड यांची उपस्थिती लाभली.

      याप्रसंगी अजिंक्य सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सचिन पवार, उपाध्यक्ष संगीत भालेराव, उत्तम दादा पवार, स्वप्नील भोसले, बाळासाहेब राठोड, विशाल जाधव, कैलास पवार, तानाजी खरशिंगे, सुमेध गुजर, सुमेधा गुजर, स्वराली गुजर आणि आयुषा गुजर यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी अजिंक्य सोशल फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. "संस्थेच्या या अनोख्या आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे समाजातील इतर घटकांनाही समाजसेवेची मोठी प्रेरणा मिळते," असे मत मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्कारमूर्तींनी फाऊंडेशनचे आभार मानले. "हा सन्मान केवळ आमच्या कार्याची पोचपावती नसून, भविष्यात समाजहितासाठी आणखी अधिक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने कार्य करण्याची ऊर्जा देणारा आहे," अशा भावना सन्मानित व्यक्तींनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि सामूहिक राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.