Ticker

6/recent/ticker-posts

रूद्रापूर येथील सैनिक भूमिपुत्राचा गावकऱ्यांकडून भव्यदिव्य नागरी सत्कार



ग्रामीण प्रतिनिधी-

महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम रूद्रापूर येथील माजी सैनिक अरूण नागोराव नारलावाड यांचा सैन्यदलात तब्बल १७ वर्ष प्रदीर्घ सेवा देत अखेर सेवानिवृत्त झाल्याने व नांदेड पोलीस दलात शिपाई म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवर,

समस्त गावकऱ्यांकडून शनिवार दि.२ मे रोजी भव्यदिव्य नागरी सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम नांदेडहून बिलोली शहरात सकाळी ११ वाजता दाखल होत छञपती शिवाजी महाराज व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून रॅलीला सुरूवात करण्यात आली.भारत मातेचा जयघोष करीत रॅली कासराळी गावात दाखल झाली.

त्यानंतर दुपारी १ वाजता रॅलीचे रूद्रापूर नगरीत वाजत गाजत आगमन झाले.

मंचावर उपस्थित नांदेड जि.प.शिक्षण व बांधकाम माजी सभापती संजय अप्पा बेळगे,बिलोली कृ.उ.बाजार समिती सभापती रवी पाटील खतगांवकर,माजी सभापती शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,जिल्हा प्रवक्ता काँग्रेस कमिटी दिलीप पाटील पांढरे,पं.स.बिलोली माजी उप सभापती शंकरराव यंकम,गावकरी व उपस्थित मान्यवरांकडून 

माजी सैनिक सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक, मान्यवर,सैनिक मनोगता नंतर वडील,बंधू अशोक नारलावाड व परिवार यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास हाणमंतराव पाटील बामणीकर, पांडुरंग रामपुरे पाटील,रमेश येशमवार,माजी सरपंच 

संजय नुकूलवार, माजी सैनिक साईनाथ जक्कावार, देगलूर पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.शिवशंकर यंकम, अल्पसंख्याक सेलचे शेख माजीद कासराळीकर, माजी  सरपंच सयाराम सिदाने,नागनाथ नियलवाड,प्रकाश मटके,

रूद्रापूर सरपंच अर्जुन शेळके,उपसरपंच राजू गायकवाड, पोलीस पाटील बालाजी शेळके,नांदेड पोलीस संजय चरकुलवार,बाबूराव चरकुलवार,नरेंद्र शिरबतळ,नामदेव ईजुलकंठे,अशोक नारलावाड,नागोराव नारलावाड,

आरूषी नारलावाड, श्रीदेवी नारलावाड,वनरक्षक सहदेव दोसलवार, संतोष सोमासे, रूद्रावार,बामणी माजी सरपंच सिद्धप्पा कञे,निवृत्त प्राध्यापक कन्हैयालाल सर, सहशिक्षक शिवदास मठपती,डोणगांव पोलीस पाटील हाणमंत कोंडामंगले,सदस्य शिवराज कुरे,अंजनीचे तलाठी आनंदराव मोखेडे,मॅनेजर साईनाथ जारीकोटे,पञकार कमलाकर जमदाडे,गौतम लंके,रोहिदास यदलवाड, 

सदस्य दिपक संदलोड व गावकरी, प्रतिष्ठित नागरिक आदि उपस्थित होते.आभार अशोक नारलावाड यांनी मानले तर सूञसंचालन पञकार जाफर आदमपूरकर यांनी केले.