: बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आजच्या युवा पिढीने जागरूक राहून विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डी. एन. गोफणे यांनी वसुंधरा दिना निमित्त मांडले.
पर्यवेक्षक श्री मोहनराव गुरव यांनी भारतीय संस्कृतीतील सणवार साजरा करण्यामागील पर्यावरण संवर्धनाची भूमिका व वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या मनोगतातून व्यक्त केला .
प्रा. जे. बी. जाधव सर यांनी विविध उदाहरणे देऊन वृक्ष संवर्धन व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली.
प्रा. सौ स्वाती चव्हाण यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले.
यावेळी वसुंधरा दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन व वृक्षारोपण करण्यात आले. विविध स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.
मान्यवरांच्या शुभ हस्ते "माझी वसुंधरा" या भित्ती पत्रकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक, सहकारी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.ज्योती गुरव यांनी आभार मानले.
श्री. राणाप्पा बडचिकर यांनी सूत्रसंचालन केले.





Social Plugin