प्रतिनिधी
आद्य परिचारिका फ्लाँरेन्स नाईटिगेंल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिनाचे महत्त्व जाणून प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर, वसुंधरा महिला मंडळ, जिजामाता महिला मंडळ अतनूर व ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था तसेच जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अतनूर स्थित प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ३२ गाव, वाडी, तांडा, वस्तीसह ५ उपकेंद्र येथील परिचारिका भगिनींचा सत्कार करून जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात आला. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती कोळ्ळे यांच्या शुभहस्ते सर्व परिचारिका भगिनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख म्हणाले की, आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह व मजबूत कणा म्हणून परिचारिकांना ओळखले जाते. परिचारिका या डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहेत. या प्रशिक्षित समूहाने एकत्र येऊन शास्त्रोक्त पद्धतीने रुग्णसेवा दिल्यास उच्च प्रतीच्या आरोग्यसेवा निर्माण करण्यासाठी देशाची आरोग्य यंत्रणा सुधारण्यास मदत होईल. सांसर्गिक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी, दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यात, आरोग्यसेवा वितरणात, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य पुरवण्यासाठी परिचारिका सदैव तत्पर असतात. शासकीय रुग्णालयातील सर्व परिचारिका भगिनी व डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात टाकून कोरोना रुग्ण चा जीव वाचविला आहे. या शब्दात परिचारिका व डॉक्टरांची स्तुती केली.
याप्रसंगी दलितमित्र तथा आरोग्यदूत बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर म्हणाले की, आपल्याला वाटते तेवढे परिचारिकांचे आयुष्य सहज व सोपे मुळीच नाही. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदारी यामुळे कित्येकदा परिचारिकांचे स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. परिचारिकांची ही मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरत आहे. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरात कार्यरत असणार्या व अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या सर्व परिचारिकांना मनापासून सलाम!
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती कोळ्ळे, आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थांचे संस्थापक राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या अध्यक्षा सौ.संध्या बाळासाहेब शिंदे अतनूरकर, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मीणबाई पांडुरंग सोमवंशी, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व ग्राहक समिती महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश संघटक बी.जी.शिंदे, आरोग्य सहाय्यक कर्मचारी सलमान शेख आरोग्य सहाय्यक बालाजी सोनटक्के, औषध निर्माता गजानन धोंडोरे, जनरल नर्सिंग मिडवाइफरी दिपा मांगीलवार, जनरल नर्सिंग लक्ष्मी मेटे, जनरल नर्सिंग आरोग्य सहाय्यक चंदा सुळकेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ महेश बिरादार, आरोग्य सहाय्यक महिला स्मिता म्हात्रे, रूग्ण वाहन चालक इस्माईल ताजोद्दीन मुजेवार, परिचारक सुनिल पिंगनवार, परिचारक पृथ्वीराज चव्हाण सह आरोग्य कर्मचारी, आणि रुग्णालयातील नातेवाईक व अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३२ गाव, ५ उपकेंद्रातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, परिचारिका, आरोग्य कर्मचारी प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
.jpg)






Social Plugin