बांधकाम विभागासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, रमेश उबाळे यांची मागणी
बुध . दि. (प्रकाश राजेघाटगे )
सातारा - राहीमतपूर रस्त्यावर वाढती वाहनांची समस्या लक्षात घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु या रस्त्यावर संबंधीत ठेकेदाराने कोणतेही सेफ्टी फॅक्टर न वापरता बेजबाबदारपणे बांधलेल्या स्पीड ब्रेकरने गर्भवती बाळाचा जन्माला येण्याआधीच बळी घेतल्याने रिपब्लिकन सेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी हा बळी नसून व्यवस्थेने केलेला खून असल्याचे सांगत बांधकाम विभाग व संबधीत ठेकेदाराव सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा - रहीमतपूर रस्त्यावर प्रिती हॉटेल ते राहीमतपूरपर्यंत एकुण 48 स्पीडब्रेकर वांधण्यात आले आहेत. हे सर्व स्पीड ब्रेकर प्रमाणापेक्षा मोठे असून हे स्पीड ब्रेकर बनविताना कोणतेही सेफ्टी फॅक्टर वापरले नाहीत. वाहनधारकांना स्पीड ब्रेकर दिसण्यासाठी पिवळे, पांढऱ्या रंगाचे पट्टे रस्त्यावर मारण्यात येतात परंतु असे काही या ठिकाणी आढळून येत नाही असे रमेश उबाळे यांचे म्हणणे आहे. स्पीड ब्रेकरची उंची इतकी आहे की चार चाकी वाहनेही स्पीड ब्रेकरने उंच उडतात.
दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले तरुण पती -पत्नी दुचाकीवरून या रस्त्यावरून रात्री प्रवास करत होते पत्नी गरोदर असल्याने अतिशय कमी वेगाने पती आपले वाहन चालवत असताना त्यांना वाटेत एक उंच स्पीड ब्रेकर लागला वाहनचालक पतीला या उंच स्पीडब्रेकरच्या उंचीचा अंदाज आला नाही या शिवाय या ठिकाणी स्पीड
ब्रेकर असल्याची खाणखुणही नव्हती, साईन बोर्ड नव्हता स्पीड ब्रेकरची उंची अधिक असल्याने पत्नी दूचाकीवरून खाली पडून जखमी झाली नातेवाईकांना ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी नातेवाईक आले त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले परंतु तोपर्यंत फार उशिर झाल्याने तिच्या पोटातील बाळ जन्माला येण्याआधीच दगावले दरम्यान ही घटना रमेश उबाळे यांना समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब हॉस्पीटलमध्ये धाव घेऊन माहिती घेतली. या रस्त्याने त्यांनी स्वतः प्रवास केला असता प्रिती हॉटेलपासुन ते राहीमतपूरपर्यंत तब्बल 48 स्पीडब्रेकर असल्याचे आढळून आले. स्पीड ब्रेकरजवळ स्पीड ब्रेकर असल्याचे पट्टे ना साईन बोर्ड काहीच खुण नसल्याचे त्याना दिसून आल्यानंतर ते संतापले. हा व्यवस्थेचा बळी असून बांधकाम विभागासह संबधीत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी यावेळी मागणी केला
पती - पत्नीच्या स्वप्नानाचा चुराडा
याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले, सदर जोडप्याचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. दोघेही सर्व्हिस करत असल्याने बाळाचे भविष्य घडविण्याच्या उद्देशाने तीन वर्षांनंतर त्यांनी बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेतला होता. मूलगा किंवा मुलगी झाली तर् नाव काय ठेवायाचे, पालन - पोषण कसे करायचे याचाही निर्णय झाला होता. या घटनेने या पती, पत्नीच्या स्वप्नानांचा अक्षरशा चुराडा झाला आहे. बाळाच्या आईला, मानसिक व शाररीक वेदना सुरु आहेत. यासाठी कुणाला जबाबदार धरायचे बांधकाम विभाग, बांधकाम विभाग झालेल्या नुकसानाची भरपाई देणारं आहेत का? असा सवाल रमेश उबाळे यांनी उपस्थित केला.
ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका अन्यथा आंदोलन
बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार संगनमताने रस्त्याचे बांधकाम करतात. स्पीडब्रेकर करताना कित्ती उंची असावी, वाहनधारकांना स्पीड ब्रेकर दिसण्यासाठी पट्टे मारणे आवश्यक असते परंतु काम करणाऱ्या ठेकेदाराने असे काही केल्याचे दिसून येत नसल्याने संबधीत ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे अशी मागणीही रमेश उबाळे यांनी केली अन्यथा आपण जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
ठेकेदाराला आली जाग
शुक्रवारी रमेश उबाळे यांनी सातारा -राहीमतपूर असा प्रवास करुन स्पीड ब्रेकर मोजून, रस्त्याच्या चुकीचे झालेल्या कामाची माहिती सोशल मीडियावर टाकल्यानंतर झोपेतून जागा झालेल्या ठेकेदाराने ताबडतोब जेसीबीच्या सहाय्याने स्पीड ब्रेकरची उंची कमी करण्याचे काम सूरू केले होते.
छायाचित्र - गर्भवती बाळाचा जीव गेल्यानंतर ठेकेदाराने स्पीड ब्रेकरची उंची कमी करण्याचे सुरु केलेले हे काम





Social Plugin