Ticker

6/recent/ticker-posts

"शिवराज्याभिषेक दिनी मोफत आरोग्य शिबिर मराठा सेवा संघाचा एक एक स्तुत्य उपक्रम"- ठाणेदार रामेश्वर चव्हाण.

 


प्रतिनिधी विजय गायकवाड

 शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मोप येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये परिसरातील एकूण 165 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण, डॉ.उत्कर्ष वायाळ अस्थिरोग तज्ञ,डॉ.प्रशांत आटोळे हृदयरोगतज्ञ,डॉ.अमोल नरवाडे, डॉ.करुणा नरवाडे, डॉ.अतुल जुनघरे, डॉ.कुलदीप देशमुख,डॉ. राम बोडखे,डॉ.महेश खानझोडे,जमाते इस्लाम हिंदचे जिल्हाध्यक्ष वकार युनूस, तालुका आरोग्य अधिकारी डाखोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघ तसेच मराठा सेवा संघाचे रिसोड येथील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ठाणेदार चव्हाण साहेबांनी“अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो असे सांगून मराठा सेवा संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले,” असे प्रतिपादन केले.

या शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. वाशिम येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. उत्कर्ष वायाळ यांनी ७२ रुग्णांची तपासणी केली, तर हृदयरोग तज्ञ डॉ. प्रशांत आटोळे यांच्याकडे ५७ रुग्णांनी तपासणी करून उपचार करत औषधीचे वितरण केले. इतर तज्ञ डॉक्टरांनीही मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी केली. सर्व डॉक्टर शिबिरात उपस्थित होते.

या उपक्रमात सत्कार करण्याऐवजी समाजप्रबोधनाचा संदेश देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या १०० प्रतींचे वाटप करण्यात आले.शिबिरात गरजू रुग्णांसाठी एक्स-रे, सोनोग्राफी व २डी इको या तपासण्यांवर सवलत देण्यात आली. या संपूर्ण उपक्रमास डॉक्टर असोसिएशन व प्राथमिक आरोग्य केंद्र, मोप यांचे सहकार्य लाभले.

या यशस्वी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व समस्त गावकरी मंडळी मोप यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रिसोड तहसीलच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांनी सुद्धा भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा मार्गदर्शक शिवश्री गजानन खंदारे,मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विजयराव बोरकर,तालुका अध्यक्ष शिवाजीराव कव्हर तसेच संतोष बिल्लारी, आदिनाथ बदर, विनोद बोडखे, पंडितराव देशमुख,अमोल बोडखे,गजाननराव देशमुख पत्रकार विजय झुंजारे, स्वामी सर,कैलास बाजड तसेच मोप येथील नागरिकांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन खंदारे यांनी तर प्रास्ताविक शिवाजी कव्हर आणि आभार विजयराव बोरकर यांनी मानले.