Ticker

6/recent/ticker-posts

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडीत केलेले वॉश बेसिन ची कामे अपूर्णच;चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ



हणमंतवाडी (अं बु) ता.निलंगा जिल्हा.लातूर. 

 ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामामध्ये मोठी दिरंगाई आणि हलगर्जीपना दिसून येत आहे,सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक महिने उलटूनही शाळेत व अंगणवाडीत बसवण्यात आलेले वॉश बेसिन चे काम अपूर्ण व नित्कृष्ट दर्जाचे झाले असून निधी मात्र पूर्ण उचलण्यात आले आहे. 

अंगणवाडीत स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वॉश बेसिन बसवण्याचे काम १५व्या वित्त आयोगा अंतर्गत लाखो रुपयांचा निधी येऊनही कामे मात्र अपूर्णच.संबधित विभागाच्या दुर्लक्षामुळे चिमुकल्यांना आजही मूलभूत सुविधा शिवाय दिवस काढावे लागत आहे.अंगणवाडीत हात धुण्यासाठी वॉश बेसिन बसवणे,पिण्याच्या पाण्याची सोय करणे अपेक्षित होते,मात्र कामे अपूर्णच राहिली आहेत.स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मते हे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली जात आहे. व संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काम त्वरित पूर्ण करावे,असा सूर ग्रामस्थामधून उमटत आहे.