बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध ता .खटाव येथे दहावी सन 1993 - 94 बॅचचा 32 वर्षानंतर स्नेह मेळावा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता . तबल्ल 32 वर्षानंतर विद्यार्थी म्हणून शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता .व आपुलकीने एकमेकांची चौकशी करत होते .विद्यालयातील विद्यार्थिनी विद्यालयाच्या मुख्य गेट पासून रांगोळी काढून मोठ्या उत्साहामध्ये त्यांचे स्वागत केले .विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मेळावा संपन्न झाला . विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आजी-माजी शिक्षक बॅज लावून त्यांचे औक्षण केले . फुलांच्या वर्षाव करून व हलगी वादयवृंद वाजवून सर्व गुरुजनांचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले . यावेळी उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमाना अभिवादन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .हयात नसलेले शिक्षक व विद्यार्थी यांना सर्वप्रथम भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली . यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी संस्था प्रार्थना व स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये विद्यालयाचा सर्वांगीण विकासासाठी करत असलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली . यानंतर माझी विद्यार्थी यांनी आपली ओळख करून दिली .विद्यालयातील सहशिक्षक भगवान सरवदे यांनी आवश्यक असणाऱ्या बाबीची माहिती दिली व सर्व माजी विद्यार्थी यांचे शब्द सुमनांने स्वागत केले .माजी विद्यार्थी यांच्या वतीने आजी-माजी गुरुजनांचा स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान केला .
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक जगताप एस.ए,पोळ व्ही .जे .मांडके बी .पी ., चव्हाण बी बी .,साळुंखे एम डी शिंदे एन .के .सौ मस्के एम डी ., सौ .शिंदे एस .एन , येवले एच बी .माने व्ही बी ,सौ ( मोहिते )गुजर बी एस . प्रा .सुहास पवार , संपत जगदाळे व विद्यालयातील शिक्षक प्राचार्य अंकुश भांगरे ,नाना दडस , भगवान सरवदे, विशाल नाळे , राऊत सर ,नामदेव धनवडे, महादेव खोमणे , गोविंद बोराटे , विकास कांबळे यांचाही सम्मान करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष गोडसे, मनोज राऊत डॉ . महेश पवार , मनोज गोडसे , शंकर शिंदे, राहूल कदम, अशिष गांधी ,संतोष जाधव , साधना देसाई , मनिषा बोराटे, रूपाली बागेकरी ,संगिता गुरव , शिल्पा फुलारी यांनी विशेष प्रयत्न केले व या बॅच च्या वतीने विद्यालयासाठी 45हजार रुपये खर्च करून स्टाफ रूम व ऑफिस समोर फरशी बसून दिली व आणखीन विद्यालयाच्या भौतिक सुविधासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद व्यक्त केले
.सर्वांसाठी स्वादिष्ट जेवण व चहा ,नाष्ट्याची उत्तम सोय करण्यात आली होती . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे व संतोष जाधव यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला .





Social Plugin