प्रतिनिधी @समाधान भुतेकर
इसरुळ हद्दीतील वस्तीवर तातडीने रात्रीच्या वेळेला लाईन उपलब्ध करून न दिल्यास सध्या भोगत असलेल्या मरण यातनेला कंटाळलो असून आता एकदाच्या सरण यातना भोगू द्या आशयाचे निवेदन देत तात्काळ न्याय देत असाल तर ठीक अन्यथा दि 10/06/026 मंगळवारला किमान अंत्यविधीला तरी या असा अनोखा व टोकाचा इशारा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांना दिला आहे. चिखली तालुक्यातील मौजे इसरुळ हद्दीतील प्रताप नगर या वस्तीवर गेल्या अनेक महिन्यापासून रात्रीच्या वेळेला लाईन गायब असते सदर प्रताप नगर हे इसरूळ गावापासून थोडे दूर असून खडकपूर्णा प्रकल्पाच्या काठावर वसलेले असल्यामुळे वस्तीच्या आजूबाजूला पाणी व इतर झाडे झुडपे अशी प्रचंड अडचणीचा परिसर आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेकदा वाघाचे दर्शन झाले असून दोन वाघ या परिसरामध्ये वावरत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे निदर्शनास आले शिवाय सदर वाघांनी त्या वस्तीमध्ये येऊन सुद्धा बऱ्याचदा शिकारी केल्या प्रचंड भयग्रस्त वातावरण असताना सर्व गावकरी हे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी जगत आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा तक्रारी केल्या परंतु त्यांनी सुद्धा कुठलाच बंदोबस्त केला नाही प्रत्येक वेळेस अंधाराचा फायदा घेऊनच त्या वस्तीवर वाघाने शिकार केली आतापर्यंत इसरूल गावासाठी सिंगल फ्युज लाईनची व्यवस्था नव्हती त्यामुळे यजी लाईन वरून सदर वस्तीवरील गावकऱ्यांना लाईन सहज मिळायची परंतु सिंगल फेज लाईन आल्यापासून रात्रीच्या गॅपमध्ये विशेषता संध्याकाळी सात ते अकरा पर्यंत कधीच प्रताप नगर वस्तीवर लाईन नसते अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यांनी जगायचे कसे जगावे की मारावे हा प्रश्न उपस्थित झाला असून आम्ही अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली विनंती अर्ज केले परंतु अजून सुद्धा त्यांनी कुठलीच पर्यायी व्यवस्था करून लाईन दिली नाही या उलट आम्हा लोकांना उलटसुलट उत्तरे दिली इसरूळ फिडर वरील एक्सट्रा फिडर चे काम गेल्या पंधरा महिन्यापासून अतिशय संत गतीने चालू असून अजून तेही पूर्ण नाही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला अनधिकृत लोड शेडिंगला सामोरे जावे लागते शिवाय हक्काचे मिळणारी आठ तासाची लाईन सुद्धा सहा तासावर गेली त्या संदर्भामध्ये आपण काय निर्णय आणि कधी घेणार आहात सन्माननीय साहेब आता पावसाळ्याचे दिवस आले असून सदर काम पावसाळा हिवाळा या वेळेमध्ये होणे आम्हाला तरी अशक्य वाटत असून प्रशासनाने तातडीने आम्हाला पर्याय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी व आम्हाला सहा ते अकराच्या दरम्यान अर्थात रात्रीच्या वेळेला लाईन मिळेल अशी तात्काळ आठ दिवसाचे आत तरतूद करावी अन्यथा आपल्या या सुलतानशाहीला कंटाळून पुऱ्या झाल्या आता मरण यातना भोगू द्या सरन यातना या नियमानुसार आम्ही आपल्या एमएसईबी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी येऊन दिनांक रोजी संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत मी स्वतः सरण रचून आपल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये स्वतःला जाळून घेणार आहे तरी आपण आमच्या अंत्यविधीला किमान हजर राहावे असे आवाहन युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी अधिकाऱ्यांना केले आहे





Social Plugin