Ticker

6/recent/ticker-posts

रनसिंगवाडीचे आप्पासाहेब घोरपडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे]

 माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित व आदर्श कार्यकर्ता गौरव समिती महाराष्ट्रचे आयोजक  दुष्यंतराजे सुरेंद्र जगताप,जिल्हा न्यायाधीश विठ्ठलराव चव्हाण साहेब,नगरसेविका पल्लवी जावळे मॅडम तसेच प्रसिद्ध प्रेरणात्मक वक्ते दत्ता कोहिनकर सर आणि अविनाश दादा गोगावले तसेच समितीच सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते रणसिंगवाडीचे सुपुत्र आप्पासाहेब घोरपडे यांना  समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला 

समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना "समाजभूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी व समाजहिताचा आहे. 

 आप्पासाहेब घोरपडे हे 2015 पासून हर्ष फाउंडेशनच्या अंतर्गत रक्तदानासारखे पुण्य काम करतात 

 कधी कोणताही रुग्ण रक्त नाही मिळाले म्हणून दगावू नये हे त्यांचे ध्येय.

हर्ष फाउंडेशन पूर्णतः व्हाट्सअप ग्रुप वर काम चालते 

 रात्री अपरात्री कोणताही रुग्ण दगावू नये म्हणून सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे, मुंबई,,नगर,नाशिक तसेच पूर्ण महाराष्ट्रात मोफत बँग संकल्पना चालू करण्यात आली.आतापर्यंत हजारो गरजू रुग्णांना रक्ताच्या बॅगची मदत झालेली आहे

 हर्ष फाउंडेशन रक्तदाता सुरक्षितता वर जास्त काम करते कारण हॉस्पिटल, पेशंट, ब्लड बँक यांच्यासाठी सर्व काम करतात पण ज्या व्यक्तीमुळे रुग्णाचा जीव वाचतो त्या रक्तदात्यालाच नंतर किंमत केली जात नाही.

रक्तदाता सुरक्षितता यासाठी पाच लाखाचा इन्शुरन्स चालू करणारे आप्पासाहेब घोरपडे हे पुण्यातीलच नाही तर भारतातील पहिली व्यक्ती आहेत 

 या इन्शुरन्स मुळे गंगाधर काळे या रक्तदात्यांचा एक्सीडेंट मध्ये निधन झाल्यावर त्यांच्या घरच्यांना रुपये पाच लाख रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आले आहेत 

 आप्पासाहेब घोरपडे यांना या आधी सुद्धा जिल्हा,,राज्य,राष्ट्रीय पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलेले आहे . कोरोनाच्या काळात मुंबई पोलीस बांधवांना 300 प्लस उपलब्ध करून दिल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त देसाई साहेब यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतीय पोस्ट ऑफिस ने 12 तिकीट देऊन आपासाहेब घोरपडे यांना सन्मानित केलेला आहे.