बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
सायन येथील श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयातील वरिष्ठ शिपाई श्री. तानाजी तुकाराम जाधव यांचा सेवापूर्ती (निवृत्ती) सोहळा तरडगाव तालुका फलटण येथे अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला.
जाधव यांनी विद्यालयात तब्बल ३६ वर्षे अविरत, प्रामाणिक आणि निष्ठावंत सेवा बजावून सन्मानाने निवृत्ती घेतली. त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम त्यांच्या जन्मगावी तरडगाव ता. फलटण जि. सातारा या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमा वेळी त्यांचा सत्कार केल्यानंतर आपले विचार व्यक्त करताना भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस रामचंद्र जाधव सर म्हणाले तानाजी जाधव यांचा
कष्टाचा आणि जिद्दीचा जीवन प्रवास ठरला आहे
१ मे १९६६ रोजी अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या श्री. तानाजी जाधव यांनी जेमतेम शिक्षण घेऊन मुंबई गाठली. मुंबईत त्यांना शिपाई पदावर काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी नोकरी सांभाळून, रोजच्या दोन तासांच्या प्रवासाव्यतिरिक्त रिक्षा चालवून अतोनात कष्ट केले. या कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. आपल्या नम्र आणि आदरयुक्त स्वभावाने त्यांनी कामाच्या ठिकाणी आणि समाजात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला.
या सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. तानाजी जाधव व त्यांच्या पत्नी सौ. कल्पना जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री रामचंद्र जाधव यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यालयातील कर्मचारी वर्ग आणि उपस्थित स्नेह्यांनी त्यांच्या भावी सुदृढ आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास
सौ. कल्पना तानाजी जाधव सौ. बकुळाबाई तुकाराम जाधव सौ. प्रियांका कुशल मांजरे(D.Pharm)
सौ. तेजस्वी दिगंबर माने
श्री. प्रसाद तानाजी जाधव
सौ. रुक्मिणी शशिकांत माने (पोलीस उपनिरीक्षक, फलटण)
श्री. कुशल शिवाजी मांजरे श्री. दिगंबर लक्ष्मण माने(संस्थापक - श्रीदत्त चॅरिटेबल ट्रस्ट, बारामती)
सौ. सुप्रिया सुमेध माने (पोलीस, मुंबई)
श्री. सुमेध माने (कॅनॉल इन्स्पेक्टर)
सौ. स्वांजिल शिवाजी जाधव (क्लार्क - नूतन विद्यामंदिर, मुंबई)
श्री. शुभम शशिकांत माने नायब तहसीलदार पोपट जाधव, वरिष्ठ मुख्याध्यापक श्रीरंग जाधव गुरुजी,भानुदास जाधव सर, तसेच विविध भागातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.





Social Plugin