वालवड : भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील विजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे चिंचपूर ढगे परिसरात विजपुरवठ्याचा प्रश्न कायमच गंभीर आहे. आसपासच्या इतर गावांना सुरळीत वीज मिळत असताना चिंचपूर ढगे येथे मात्र वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
चिंचपूर ढगे गावाचा वीजप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाला वालवड येथील नवीन सबस्टेशनशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर बसविण्याबरोबरच चिंचपूर ढगे ते वालवड ही वीजवाहिनी उभारण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सर्व कामे पूर्ण होऊनही अद्याप गावाला वालवड सबस्टेशनवरून महावितरणकडे तकार करूनही उपाययोजना नाहीत
विजपुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या सबस्टेशनच्या कामावरून स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवाद रंगला होता. यामध्ये आ. तानाजी सावंत व माजी आ. राहुल मोटे यांच्या कार्यकत्यांकडून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गावकऱ्यांना अपेक्षित असलेला नियमित विजपुरवठा अद्याप मिळालेला नसल्याने श्रेयवादापेक्षा प्रश्न सोडविण्यावर भर देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या चिंचपूर ढगेसह साडेसांगवी, गोलेगाव आणि नवलगाव या चार गावांचा विजपुरवठा भूम सबस्टेशनअंतर्गत असलेल्या चिंचपूर फीडरवरून केला जातो. मात्र विजपुरवठ्यात बिघाड झाल्यास अनेकदा केवळ चिंचपूर ढगे व साडेसांगवी ही दोन गावे अंधारात ठेवली जातात, तर गोलेगाव व नवलगाव या गावांचा विजपुरवठा सुरू ठेवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ सतत करत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गोलेगाव व नवलगाव वरून येणारी मुख्य लाईन स्वतंत्रपणे सुरू ठेवण्यासाठी एबी स्विचचा वापर केला जातो, तर चिंचपूर ढगे व साडेसांगवीचा पुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे या दोन गावांतील नागरिकांना वारंवार वीजटंचाईचा सामना करावा लागतो.





Social Plugin