बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
राजापूर ता . खटाव येथील कै सुलाबाई नारायण गार्डे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्यापकाळाने निधन झाले . राजापूर येथे पहिल्यांदाच पारंपारीक पद्धतीला फाटा देत त्यांच्या मुलांनी सत्यशोधक पध्दतीने अंत्यसंस्कार व पुढील विधी करून सर्वापुढे आदर्श ठेवला आहे . यापुढे गावातील विधी या पद्धतीने करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले . राजापूर,ता.खटाव, येथील कै.सुलाबाई नारायण गार्डे यांचे वृद्धपकाळाने गुरुवारी निधन झाले. त्यांचे सुपुत्र सत्यशोधक समाजाचे खंदे समर्थक व ,श्री संतशिरोमणी सावता माळी मित्र मंडळ, कोपर खैराणे, नवी मुंबई या मंडळाचे उपाध्यक्ष श्री.सत्यशोधक वामन नारायण गार्डे , चंद्रकांत , सुभाष , बबन यांनी त्यांच्या मातोश्रीचे अंत्यसंस्कार सत्यशोधक पध्दतीने संप्पन केले . त्यासाठी खास श्रीगोंदा, अहिल्यानगर येथून श्री.भीमराव कोथिंबीरे, तसेच आदकीॅहुन श्री.अजित जाधव हे उपस्थित होते. यावेळी सत्यशोधक पध्दतीने मंत्रोच्चार करण्यात आले महात्मा फुले यांचे अखंड व पसायदानाचे सामुहिक पठण करण्यात आले तसेच कै.सुलाबाई गार्डे यांच्या प्रतीमेस उपस्थितांनी फुले अर्पण केली.
अस्थि एकत्रित करुन तीन खडयांमध्ये पुरण्यात आल्या व त्यावर वड, पिंपळ व आंबा यांचे वृक्षारोपण त्यांची मुले, सुना व नातवंडे यांचे हस्ते समस्त ग्रामस्थ, अप्तेष्ट, नातेवाईक यांचे समक्ष करण्यात आले. यावेळी श्री.भीमराव कोथिंबीरे,श्री.दशरथ घनवट गुरुजी यांनी सत्यशोधक वामनराव गार्डे यांनी घेतलेल्या क्रांतिकारक व धाडशी निर्णयाचे स्वागत केले व सर्व गावकऱ्यांनी याचे अनुकरण करावे असे आव्हान केले. त्यावेळी बहुसंख्य उपस्थितांनी यापुढे मयत व्यक्तींचे अंत्यसंस्कार सत्यशोधक पध्दतीने करण्याचा निर्धार व्यक्त केला.या क्रांतिकारक निर्णयाबद्दल संत शिरोमणी सावता माळी मित्र मंडळ कोपरखैराणे व शिव फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन मंच यांच्या वतीने संपूर्ण गार्डे कुटुंबाचे स्वागत आहे. असेच आपल्या हातातून तात्यासाहेब महात्मा क्रांती सूर्य जोतीराव फुले व माई क्रांत्ती ज्योती सावित्री माई फुले यांच्या विचाराचे महान काम आपल्या हातून घडत जावे हीच निर्मिक चरणी प्रार्थना. यापूर्वी शनिवारी सावडण्याचा विधी निषिद्ध मानला जात होता .
तरीसुध्दा येईल त्या वाराला म्हणजे शनिवारी सावडण्याचा विधी करण्यात आला . सत्यशोधक भिमराव कोथंबिरे श्रीगोंदा यांनी सत्यशोधक पध्दतीने विधी विनामोबदला केला . कावळा शिवणे या बाबीला फाटा देण्यात आला .पायावर गोमुत्र घेणे , भस्म लावणे टाळण्यात आले .पाहुण्यांना दुध टाकलेला चहा देण्यात आला . अशा पध्दतीने सत्यशोधक़ पध्दतीने हा पहिलाच कार्यक्रम करून नविन आदर्श निर्माण केला .





Social Plugin