Ticker

6/recent/ticker-posts

किनवट माहूर तालुक्याचा तारणहार : ॲड.अर्चित अरुणकुमार नाईक

      


 

ग्रामीण प्रतिनिधी :- छगन जाधव पळशी किनवट 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड होताच किनवट तालुक्यात सर्वपरिसरातून शुभेच्छा चा वर्षाव ॲड. अर्चित नाईक यांचा नेतृत्वावर टाकलेला विश्वास दिसून येत आहे.

       मागच्या अनेक दिवसांपासून किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) पक्ष्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाच वातावरण झालं होतं. साहेबांनी कार्यकर्त्याची कुवत ग्रामपंचायत सदस्य होण्याइतकी नव्हती त्यांना अनेक महत्वाच्या पदावर बसवली पण त्यांच्या पश्चात त्यांनी स्वार्थासाठी आणि आपल्या राजकीय महत्वकांसेसाठी नाईक परिवाराची कठीण समयी साथ सोडली पण एक व्यक्ती होता जो नेहमी निष्ठावंत कार्यकर्त्यांना आधार देत होता आणि त्याचं नाव म्हणजे ॲड. अर्चित अरुणकुमार नाईक. आजचा दिवस किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी  सोन्याचा दिवस आहे. युवा नेते ॲड. अर्चित भैय्या नाईक यांना मिळालेला आजचा प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पद हे नक्कीच येणाऱ्या 2029 च्या विधानसभा निवडणुकीत वरदान ठरेल आणि पुन्हा एकदा येथील रखडलेल्या विकासाला अर्चित भैय्या नाईक यांच्या रूपाने एक नवीन नेता मिळेल हे नक्की.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल अर्चित भाऊ नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन. येणाऱ्या काळात आपण किनवट माहूर तालुक्याचं नाव नक्कीच संपूर्ण राज्यभर नावलौकिक कराल अशी अपेक्षा आहे. 

किनवट नगरपंचायतीच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (उ .भा.ठा) गटाच्या सो. सुजाता येंड्रालावार यांनी भाजपचे आनंद मच्छेवार.यांच्या सौभाग्यवतीस पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. पंचायती पक्षीय  (उ.भा.ठा) 3 भाजपचे 4 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 5 काँग्रेस 1 राष्ट्रवादी ( अजित पवार ) 5 इतर 3 नगरसेवक विजय झाले .

(उ .भा.ठा ) व  (शरद पवार) यांची युती नगर पंचायत बहुमत च्या दिशेने मजबूत झाली आहे . आणि (उ.भा.ठा ) गटाचे सो.सुजाता येंड्रालावार यांनी नगर अध्यक्षपदावर मशाल पेटवली या निवडणुकीत सर्व नवीन चेहरे युवा कार्यकर्त्यांना संधी दिली येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत आपल्याला कसा विजय मिळवता येईल .   युवा पिढीच नेतृत्व कसा घडवता येईल यावर विचार करत अँड:-अर्चित नाईक म्हणाले समोर येणाऱ्या निवडणुका आपण शंभर टक्के जिंकू असा शब्द त्यांनी युवा पिढीला दिला आहे.