देगलूर - प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील येरगी येथे दि-28-0626 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत आरोग्य उपकेंद्र, येरगी येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी सरपंच संतोष पाटील येरगीकर यांनी पोलिओ बूथला भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी 0 ते 5 वर्षे वयोगटातील उपस्थित बालकांना स्वतःच्या हस्ते पोलिओ डोस पाजला आणि पालकांशी संवाद साधला.
"पोलिओ निर्मूलनासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. लसीकरण हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे," असे मत या वेळी संतोष पाटील येरगीकर व्यक्त केले. त्यांनी नागरिकांना घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले.
या प्रसंगी आरोग्य उपकेंद्राचे डाॅ.किरण ठाकरे, सिस्टर रुपाली जाधव, संतोष कांब्दे, ग्रामपंचायत सदस्य अशोक बरसमवार, बसवंत पाटील, नंदकिशोर चिद्रावार, मा.उपसरपंच यादव बरसमवार, गजानन चेडके, बालिका पंचायत राजचे सरपंच अंजली वाघमारे, कर्मचारी आशा वर्कर्स शिवनदा कालीगवार, द्रौपदी भुरूळे, शिवा कांबळे, बजरंग भुरळे, पदाधिकारीआणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेद्वारे 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ डोस दिला जातो. भारत पोलिओमुक्त झाला असला तरी शेजारील देशांमधील धोक्यामुळे ही प्रतिबंधात्मक मोहीम नियमितपणे राबवली जाते.





Social Plugin