Ticker

6/recent/ticker-posts

घे भरारी. आंध्रुड मध्ये नारीशक्ती एकवटली.


साहेबराव अंभोरे @ ग्रामीण प्रतिनिधी 

मेहकर :- तालुक्यातील आंध्रुड येथे दि. 25/ 6/ 2026 रोजी संघर्ष ग्राम संघाची agm (वार्षिक सर्वसाधारण सभा) घेण्यात आली असून सदर agm मध्ये fpo चे ceo श्री मगर सर ,सेंटर मॅनेजर श्री वाघमारे सर,CC इंगोले मॅडम,पोलीस पाटील श्री अमोल देशमुख,ग्रामसंघ पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व समूहातील महिला बहुसंख्येने हजर होत्या.

          सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हात धुऊन औक्षण करण्यात आले.नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे हार अर्पण करून पूजन करण्यात आले .त्यानंतर प्रार्थना व प्रतिमा पूजन करण्यात आले.प्रास्ताविकात CC इंगोले मॅडम यांनी अनेक योजना, परतफेड, रेकॉर्ड,उद्योग Fpo,ifc,महिला सक्षमीकरण,उद्योग वाढ याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.त्यानंतर ग्राम संघ लिपिका रूपाली जाधव यांनी ग्राम संघाचे आर्थिक विवरण व अहवाल वाचन केले.

         नारीशक्ती समूहातील महिला सिंधुताई गजानन देशमुख यांनी त्यांची सुंदर व प्रेरणादायी यशोगाथा सांगितली. आज त्यांचे 5 हून अधिक उद्योग उभे असून त्यामध्ये उमेद अभियानाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी यशोगाथेमधून सांगितले.तसेच सुजाता समूहातील सुनीता सरदार यांनी त्यांची दूध उत्पादन,म्हैस पालन व्यवसाय व सेंद्रिय निविष्ठा केंद्र व्यवस्थापन याबद्दल त्यांच्या यशोगाथेमधून त्यांचा प्रवास उलगडला.

         सेंटर मॅनेजर श्री वाघमारे सर यांनी विमा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व महत्त्व समजावून सांगितले.fpo कंपनी चे ceo श्री मगर सर यांनी fpo कंपनी,शेअर तसेच fpo कंपनीमधून मालाची खरेदी विक्रीबद्दल मार्गदर्शन केले.

पोलीस पाटील श्री अमोल देशमुख यांनी महिला सक्षमीकरण, महिलांचे कायदेशीर हक्कांबद्दल मार्गदर्शन करून अंधश्रद्धेविषयी कशी जागरूकता असावी हे अंकशास्त्राच्या खेळाद्वारे समजून सांगितले.

       आजच्या सभेचे अहवाल वाचन लिपिका रुपाली जाधव यांचे सोबतच flcrp रुपाली वैद्य यांनी केले.याप्रसंगी सभेचे प्रभावी,बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्राम सखी पूजा वानखेडे यांनी करून उपस्थितांची मने जिंकली. सभेला संघर्ष महिला ग्राम संघ, आंध्रुड यांनी मोलाचे सहकार्य केले. सभेला गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. नवी भरारी घेण्यासाठी या सभेने नारीशक्तीच्या पंखांला निश्चितच नवे बळ दिले एवढे मात्र खरे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे agm चे नाविन्यपूर्ण उपक्रम.

▫️अत्यंत गरीब गरजू व अपंग मुलांना शैक्षणिक कीट वाटप. ▫️समूहातील गरीब व अपंग महिला संगीता लोखंडे यांचा साडीचोळी देऊन सन्मान.

▫️उद्योजिका सिंधुताई देशमुख यांचा देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान.

▫️गावातील गाजलेली शॉर्ट फिल्म 'चतकोर भाकर' ला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला असून 'उमेद'च्या महिला फक्त घर उद्योग या क्षेत्रातच नाही तर सिने क्षेत्रातही वर्चस्व गाजवत आहेत हे विशेष.

▫️ चतकोर भाकर फेम अभिनेत्री तथा श्रीराम समूहातील सदस्या ज्योती अमोल देशमुख यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार.

▫️स्वतः पुष्पगुच्छ तयार केलेल्या समूहातील महिलांचा सत्कार. ▫️रांगोळी काढणाऱ्या महिलांचा सत्कार.

▫️ समूहातील प्रत्येक महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार.