हाता | प्रतिनिधी :- राजेश दामोदर :-
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मोजे निंबी येथील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असली तरी अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना कोणत्याच प्रकारची करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच शेतीमालाची वाहतूकही फार मोठे कठीन झाले आहे.
यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा पंतप्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मोजे निंबी येथील मुख्य रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रीट अथवा दर्जेदार डांबरीकरण करून कायमस्वरूपी बांधकाम करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामविकासासाठी दर्जेदार रस्ते ही मूलभूत गरज असल्याने संबंधित प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन निधी मंजूर करावा व रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





Social Plugin