व्हॉईस ऑफ मीडिया'ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर बन्सीलाल पांचाल, पर्वत कुमार मिश्रा, कौशिक अधिकारी आणि बालाजी ए. यांची विभागीय राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड.!!
मन्सूर शहा:----
नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर संघटित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने २८ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीची चोषणा केली आहे. या कार्यकारिणीत देशातील १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील प्रतिनिधिर्धीना स्थान देण्यात आले असून, संघटनेच्या राष्ट्रीय विस्ताराला आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रीय अध्यक्षः अनिल म्हसके (महाराष्ट्र) प्रादेशिक राष्ट्रीय अध्यक्षः,बन्सीलाल पांचाल (हरियाणा) उत्तर विभाग,पर्वत कुमार मिश्र (ओडिशा) पूर्व विभाग,कौशिक अधिकारी (त्रिपुरा) - ईशान्य विभाग,बालाजी ए. (तामिळनाडु) दक्षिण विभाग राष्ट्रीय उपाध्यक्षः,निरंजन शर्मा (मध्य प्रदेश),सुमन गांगुली (पश्चिम बंगाल),श्रीकृष्ण चांडक (महाराष्ट्र),अशोक वानखंडे (दिल्ली) राष्ट्रीय समन्वयकः अंजली दुबे (उत्तर प्रदेश) रंजना शुक्ला (हरियाणा) हराधन पॉल (त्रिपुरा) दयानंद चौधरी (त्रिपुरा) हरीशेंद्र निषाद (उत्तर प्रदेश) शिबानंद पटनायक (ओडिशा) सुमित तिवारी (उत्तराखंड) ज्योतिंद्र सिंह (मणिपूर) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यः सुनील जोसेफ (केरळ) उत्तम दीक्षित (राजस्थान) स्वपना दत्ता (आसाम) अक्षित महाजन (जम्मू-काश्मीर) राजेश दुबे (बिहार) राष्ट्रीय संचटकः गिरीश भटेले (मध्य प्रदेश) ओकेनजीत सुंधाम (नागालैंड) अमित रॉय (पश्चिम बंगाल) पारूल शर्मा (हिमाचल प्रदेश) हितेश मारू (गुजरात)
समावेश असलेले राज्ये व केंद्रशासित प्रदेशः
महाराष्ट्र, तामिळनाडु, हरियाणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, उत्तराखंड, मणिपूर, नागालँड, हिमाचल प्रदेश, गुजरात, केरळ, आसाम, बिहार तसेच केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि जम्मू-काश्मीर.
देशभरातील पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकार कल्याण, संघटनात्मक विस्तार, प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि पत्रकारांच्या विविध प्रश्शांसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याच्या उद्देशांने ही कार्यकारिणी कार्यरत राहणार असल्याचे संघटनेने स्पट केले आहे. विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांचे प्रतिनिधित्व असलेली ही कार्यकारिणी व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
तुमच्या निवडीबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
तुमच्या पुढील वाटचालीस आणि यशासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशीच निष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टतेची कास धरून काम करत राहावे आणि दररोज यशाचे नवे टप्पे गाठावेत, हीच सदिच्छा. ईश्वर तुम्हाला निरंतर प्रगती, उत्तम आरोग्य आणि यश प्रदान करो.
'व्हॉइस ऑफ मीडिया' (VOM) इंटरनॅशनल फोरम आपल्या या परिवारात तुमचे मनापासून स्वागत करत आहे. पत्रकारिता अधिक बळकट करण्यासाठी आणि पत्रकारांचे हक्क व कल्याण जपण्यासाठी आपण मिळून काम करण्यास उत्सुक आहोत.
पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!





Social Plugin