Ticker

6/recent/ticker-posts

कोकणामध्ये अचानक पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील शेतकरी चिंताग्रस्त



🌸 देवगड  प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸महाराष्ट्र ग्रामीण न्यूज 🌸 

 सध्या कोकणामध्ये पावसाने अचानक दडी मारल्यामुळे कोकणातील शेतकरी हा चिंताग्रस्त झालेला आहे. इल निनोच्या  प्रभावाखाली संपूर्ण जगाचे हवामानाचे बदल घडून आलेले सध्या सगळ्यांना दिसत आहे. त्यात भारतात सर्वत्र व महाराष्ट्रात खास करून कोकणामध्ये याचा प्रभाव अधिक तीव्र असा जाणवला गेलेला आहे. याचे कारण या महिन्यात पाऊस पुष्कळ पडतो पण आता तो दडी मारला गेलेला आहे.  हवामानात उष्ण व गरम व बाष्पीभवन अति प्रमाणात आहे व पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात दिसण्यात आलेले आहे. परिणामी सर्वत्र शेतकरी जे शेतकरी करतात त्या शेताच्या पिकावर परिणाम झालेला आहे या पावसाअभावी पावसाची थोडी बहुत सुद्धा सर आता या कोकणात लागत नाही आहे. परिणामी शेतातील पीक ही पाण्याअभावी फिकी दिसू लागलेली आहेत. अनेक वातावरणातले बदल हे सध्या पृथ्वीच्या रोटेशन पद्धतीत होत असल्याने दिसण्यात आलेले आहे.

 त्याशिवाय प्रदूषण, रासायनिक कारखाने, युद्ध जनक परिस्थिती, केमिकल्स चा वापर निसर्गामध्ये अति प्रमाणात करणे, झाडांची कत्तल जंगलामध्ये करणे अशा अनेक बाबी निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या अशा आहेत परिणामी याचा परिणाम वातावरणात पृथ्वीतलावर दिसण्यात आलेला आहे. सध्या पाऊस गेला असला तरी शेतकरी हा चिंताग्रस्त होऊन बसलेला दिसतो. त्याचप्रमाणे कोकणातील आंबा बागायतदार आहेत त्यांना सुद्धा फळ झाड लागवड यांची चिंता निर्माण झालेली आहे. याचे कारण असे की योग्य ते प्रमाणातला खतांचा डोस शेतकरी पावसा अभावी तो झाडांना देऊ शकत नाही आहे. इतर शेतकरी सुद्धा फळझाडाची जी मशागत करतात ती सुद्धा आता ह्या पावसाअभावी थांबवली गेलेली आहे. सध्याचे वातावरण हे उष्ण व दमट अशा परिस्थितीत आहे. काही ठिकाणी विहिरीची पातळी ही सुद्धा खाली गेलेली आहे. 

जे निसर्ग मधील नदी नाले शोभनीय असे झरे जे पावसाच्या पाण्याने अति वेगाने वाहतात त्यांचा सुद्धा जोर या कमी पावसाअभावी झालेला आहे. काही कोकणातील शेतकऱ्यांनी कृत्रिम रित्या पंप लावून पाण्याचा निचरा शेतांना देऊन शेती करत आहे. काही ठिकाणी झाडांची लागवड करणे व लावण्याचे कार्यक्रम आहेत ते सुद्धा पुढे ढकलले गेलेले आहेत.तेव्हा माणसाने व शास्त्रज्ञानाने  नको नको ते प्रकल्प निसर्गात आणून त्याची विल्हेवाट लावू नये.  निसर्गाचा पर्यावरण समतोल हा कसा काही व चांगला  व्यवस्थित राखला जाईल याची काळजी घेतली गेली पाहिजे.