Ticker

6/recent/ticker-posts

नगरसूल सह परिसरात पावसाची हजेरी बळीराजा सुखावला...

 

प्रतिनिधी : विशाल गंडाळ येवला 

 नगरसूल ...... ........मंगळवारी नगरसुलसह परिसरात पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे नगरसुल सह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.परिसरातील पेरणी जवळजवळ पूर्ण होऊन पावसाने उघडीक दिल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला होता. परंतु आता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या पावसाचा खरीप पिकांसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.परंतु अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.......