Ticker

6/recent/ticker-posts

ज्याचे आरोग्य चांगले, त्याचा आत्मविश्वास चांगला- डॉ. श्री सुरेशराव जाधव .



बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ]

  विद्यार्थ्यांना मोबाईलचा अति वापर करू देऊ नका त्या ऐवजी मुलांच्या हातात पुस्तक द्या व त्यांच्या मनावर संस्कार घडवा. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षक,पालक व  विद्यार्थी यांच्यात सुसंवाद व्हायला हवा. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार शिक्षण दिले जात असून त्याचा चांगला परिणाम अशा निकालातून दिसत आहे. संस्था ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यावर अधिक भर देत असून विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख   देण्यासाठी तंत्र शिक्षणाची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करून  देणारे विद्यार्थी सर्वांकरता प्रेरणा ठरले आहेत. विद्यार्थ्यांची मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी चांगले आरोग्य गरजेचे असून त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. असे विचार संस्था अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव  यांनी व्यक्त केले.  श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथील पालक शिक्षक सहविचार सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

 कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री मोहनराव जाधव   उपस्थित होते.तसेच श्री ज्ञानेश्वर काटकर,श्री. विक्रम चव्हाण,श्री चंद्रकांत शिंदे, श्री.विजय पंडित सर,पर्यवेक्षिका सौ  एस. जे. लाड तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सौ.अमृता जाधव यांनी स्वागत केले.मुख्याध्यापक श्री. डी. एन. गोफने यांनी प्रास्ताविक केले.  श्री चंद्रकांत शिंदे व श्री विजय पंडित यांनी पालक मनोगती व्यक्त केली. श्री मोहनराव गुरव व श्री महेश चव्हाण यांनी शिक्षक मनोगते व्यक्त केली.यावेळी संस्थेच्या वतीने इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मधील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले  आले.संस्था उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी कार्यक्रमास  शुभेच्छा दिल्या. सौ. सोनवले मॅडम व श्री  बी. एस. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.सौ.स्वाती जाधव यांनी आभार मानले