बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
सध्याच्या काळात धार्मिक द्वेषामुळे सदभावनेची हानी होत आहे. अतिरेकी चंगळवादामुळे तरुणाई दिशाहीन होत चालली आहे. मूल्यहिन राजकारणामुळे संविधान आणि संस्कृतीला बाधा येते आहे. त्यातून मानवनिर्मित अंधार दाटत चालला आहे. अशा परिस्थितीत समाजमनात विवेकदीप प्रज्वलित करणे गरजेचे आहे.
सतिशतात्यांनी आयुष्यभर निगर्वीपणाने सेवाभाव जपला. राजकारण, शिक्षण, साहित्य,,कला आणि संस्कृती अशा विविध क्षेत्राच्या समृद्धीसाठी भरीव योगदान दिले. समाजाच्या सर्व घटकात त्यांनी प्रेम विश्वास आणि सामंजस्य निर्माण केले. संस्कृती प्रकाशानाच्या प्रगतीसाठी सदैव प्रोत्साहन दिले. त्यांच्या नावाचा पुरस्कार म्हणजे बंधुत्वाचा आहे. साहित्यातील प्रकाशन संस्थानी असा बंधूभाव जपला पाहिजे,असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व लेखक डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. पुसेगाव येथील सेवागिरी मंगल कार्यालयात कै.सतीश तात्या फडतरे यांच्या स्मरणार्थ कार्य गौरव आणि फुलानंद उत्कृष्ट पालक पुरस्कार.. समारंभ आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस ज्येष्ठ विचारवंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर एड.प्रमोद आडकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, पुसेगाव शाखेचे अध्यक्ष अविनाश फडतरे, वैशाली फडतरे आणि सौ. ललिता सबनीस उपस्थित होत्या. यावर्षीचा संस्कृती प्रकाशन चा सतीश तात्या गौरव पुरस्कार स्वीकारताना डॉ. पाटणे पुढे म्हणाले संस्कृती प्रकाशन आणि फडतरे कुटुंबीयांनी तात्यांच्या स्मरणार्थ दिलेला पुरस्कार माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. याशिवाय विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फुलानंद पुरस्कार देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी ग्रामीण भागात सतीश तात्यांच्यासारखे निस्पृह कार्यकर्ते घडल्यामुळेच समाजामध्ये बंधुत्वाचा संदेश पोहोचला. फडतरे कुटुंबाची सामाजिक व राजकीय वाटचाल तात्यांच्या कार्यकर्तृत्वाने गाजली गेली. त्यांचा आदर्श घेऊन सुनिताराजे पवार यादेखील पुण्यासारख्या शहरात साहित्य संस्कृतीचा वसा पुढे घेऊन जात आहेत. कर्तुत्ववान लेखक घडवण्याचे काम संस्कृती प्रकाशन संस्थेने केले आहे. ऍड. अडकर यांनी शुभेच्छा पर संदेश दिला तर सुनिता राजेपवार यांनी कार्यगौरव पुरस्कारा पाठीमागची भूमिका विशद केली. स्मृतींना जिवंत ठेवण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्या स्मृतींमधून समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवणे. याच विचारातून हा उपक्रम सुरू केला आहे. असे त्या म्हणाल्या.या वेळी येथील श्री सेवागिरी विद्यालय व हनुमानगिरी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या ऐश्वर्या देशमुख, प्रज्ञा शितल जाधव, सेकंड लेफ्टनंट जयवर्धन मदन जाधव, अमृता कोरे आणि प्रणिता खटावकर यांचा फुलानंद पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासन पुरस्कार सन्मानीत सुप्रसिद्ध गायिका ऋचा बोन्द्रे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अविनाश फडतरे यांनी केले पप्रतीक्षा सुसेन जाधव , जयदीप ननावरे, प्रमोद आडकर यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन अजित चव्हाण आणि आभार प्रदर्शन लेखक दिनेश फडतरे यांनी केले.सदर समारंभास देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, सेवागिरी पतसंस्थेचे चेअरमन संजय शामराव चव्हाण, उपाध्यक्ष निखिल फडतरे, व्यवस्थापक नितीन जाधव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रा. जगन जाधव, विठ्ठल तोडकर, रमेश फडतरे, तन्मय पवार, निवृत्त सर्कल प्रकाश पवार, राजेश कदम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin