राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : शहरातील राजेश्वर मंगल कार्यालयात बुधवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता इयत्ता दहावी व बारावीच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही विशेष गौरव केला जाणार आहे.
शैक्षणिक उल्लेखनीय यश क्षेत्रात संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे या कार्यक्रमाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यंदाचा कार्यक्रम अपरिहार्य कारणांमुळे पूर्वनियोजित तारखेऐवजी ३० जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. दहावी व बारावीमध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थित असे आवाहन राहावे, आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळण्यास मदत होणार असून, शिक्षण क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची परंपरा अधिक बळकट होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केले आहे





Social Plugin