स्वप्नील माकोडे ग्रामीण प्रतिनिधी राळेगाव
*राळेगाव, यवतमाळ दि. 2 ऑगस्ट* : 10वी आणि 12वी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा *"गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ - वर्ष 2 रे"* आज त्रिमूर्ती मंगल कार्यालय, राळेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा उपक्रम *राहुल मेश्राम* यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला होता.
*यावेळी उपस्थित मान्यवर:*
1. *डॉ. प्रेमळ नवरंगे* - ऑर्थोपेडिक सर्जन
2. *मा. इंजि. अक्षय घावट* - उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन
3. *मा. अॅड. वैभव एडके* - अधिवक्ता, उच्च न्यायालय नागपूर , व गोपाल मशरु, जितेंद्र कहुरके,प्रतिक बोबडे, स्वप्नील घोटेकार, डॉ. कोकरे, नरेश राऊत, रंजन चौधरी, मंजुषा सागर म्याडम, सतिश पाटिल, आयान खान व
इतर मान्यवर उपस्थित होते.
*"गौरव गुणवंतांचा... अथक परिश्रमाचा!"* या घोषवाक्यासह झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मेहनत, चिकाटी आणि देशसेवेचे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
🎓 *गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ - वर्ष 2 रे* 🎓
*आज उत्साहात संपन्न*
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला सलाम!
आयोजक: राहुल मेश्राम





Social Plugin