Ticker

6/recent/ticker-posts

आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नांना यश;शहापूर आगारात ५ नवीन एसटी बस दाखल



परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने प्रवाशांना दिलासा;  लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न


शहापूर ()| प्रतिनिधी :- प्रफुल्ल शेवाळे 

शहापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, आमदार तथा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. दौलत दरोडा यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने शहापूर आगाराला ५ नवीन एसटी बस उपलब्ध झाल्या. या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आज शहापूर बसस्थानक येथे आमदार दौलतजी दरोडा यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.

नवीन बसेसच्या समावेशामुळे शहापूर आगाराची वाहतूक सेवा अधिक सक्षम होणार असून ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री. संजय तिवरे, प्रदेश चिटणीस श्री. डी. के. विशे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा कल्पनाताई तारमळे, तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष दिपक बोंबे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. जगदीश पवार, युवक तालुका अध्यक्ष दिनेश चंदे, तालुका संपर्क अध्यक्ष दीपक लकडे, शहापूर आगार प्रमुख सौ. शेळके, आगारातील अधिकारी व कर्मचारी, विविध सेलचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यातही अशाच विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.