Ticker

6/recent/ticker-posts

आपल्या हक्काच्या योजनांसाठी शासन आपल्या दारी, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरातून हजारो लाभार्थ्यांना दिलासा:



मन्सूर शहा.धोत्रा.भ.चिखली.:---

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महायुती सरकारच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराअंतर्गत आज चिखली येथील मौनी बाबा संस्थान परिसरात भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लोकाभिमुख उपक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महायुती सरकारच्या योजना थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक व्हावे तसेच नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, या उद्देशाने राज्यभर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

या शिबिरातून शासनाच्या १२ विविध यंत्रणांमार्फत एकूण ३,२८२ लाभार्थ्यांना ७,४२,४१,३५२ रुपये इतक्या विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण व लोकार्पण करण्यात आले. महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास, उद्योग, वीज, सहकार, पोस्ट विभाग आणि इतर विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.


✴️ विविध योजनांवर महत्त्वपूर्ण कार्यवाही:

या शिबिरामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, जिवंत सातबारा मोहीम, सिंधी विस्थापितांसाठी विशेष अभय योजना-२०२५ ला मुदतवाढ, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनांतील विशेष तरतूद, कुंभार समाजासाठी सवलती तसेच शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी पूर्णपणे माफ अशा अनेक महत्त्वपूर्ण योजनांवर कार्यवाही करण्यात आली.


महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीमुळे महसूल विभागात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण, एन.ए. प्रक्रिया सुलभ करणे, स्टॅम्प ड्युटीशिवाय कौटुंबिक वाटणीपत्राची सातबारावर नोंद, भोगवटादार वर्ग-२ जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतर, महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना यांसारखे निर्णय सामान्य नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरले आहेत.


✴️ भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

१४ जानेवारी २०२६ रोजी महायुती सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पूर्ण मालकी हक्क, खरेदी-विक्रीची सुलभता आणि बँकांकडून कर्ज मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासी आणि माजी सैनिकांना शासनाकडून भोगवटादार म्हणून मिळालेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करून त्या जमिनीवरील पूर्ण मालकी हक्काची प्रमाणपत्रेही या शिबिरात वितरित करण्यात आली.


✴️ महिलांना सक्षमीकरणाची नवी दिशा:

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शासकीय पडीक जमीन केवळ १ रुपया वार्षिक भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चारा उत्पादन, बांबू लागवड आणि रोपवाटिका निर्मितीद्वारे महिलांना रोजगार व स्वावलंबनाची नवी संधी मिळत आहे. याच शिबिरात महिला शेतकऱ्यांना अधिकृत 'महिला शेतकरी' प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


✴️ जिवंत सातबारा मोहिमेचा चिखलीला अभिमान:

चिखली तालुक्यात सुरू झालेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेची दखल महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी घेत संपूर्ण महाराष्ट्रात तिची अंमलबजावणी केली. अधिवेशनादरम्यान या उपक्रमाला मान्यता देऊन राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले, ही चिखलीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.


✴️ शेतकरी बांधवांसाठी कर्जमुक्तीची मोठी संधी:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रथम प्राप्त यादीनुसार १०,९८५ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६,९९५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून ३,९९० शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २,२९३ तर राष्ट्रीयीकृत बँकांचे ८,६९२ शेतकरी आहेत. कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.


✴️ घरकुल योजनांमध्ये चिखली आघाडीवर:

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत १०,९०० घरकुलांना मान्यता मिळाली असून १,४०० घरे पूर्ण झाली आहेत तर ३,३०० घरे अंतिम टप्प्यात आहेत. चार ग्रामपंचायतींमध्ये २२४ घरकुलांसाठी शासकीय जागेचे वाटप पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि मोदी आवास योजना अंतर्गत ५,१०० घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी ३,०२३ घरे पूर्ण झाली आहेत तर १,००० घरे अंतिम टप्प्यात आहेत.


✴️ पाणंद रस्ते आणि ग्रामीण विकासाला गती:

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेअंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत ८१२ कामांना मंजुरी मिळाली असून ७२ कामे पूर्ण झाली आहेत तर ११० कामे अंतिम टप्प्यात आहेत. पावसाळ्यानंतर उर्वरित कामांनाही गती देण्यात येणार आहे.


✴️ सिंचन क्रांतीकडे मोठे पाऊल:

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासारखा सुमारे ८२ हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प मंजूर झाला आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.


✴️ नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा:

या शिबिरात जिवंत सातबारा मोहीम, वारस नोंदी, स्वामित्व सनद, डिजिटल सातबारा, पीएम किसान, प्रधानमंत्री आवास योजना, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, नवीन रेशनकार्ड, आधार अद्ययावतीकरण, विविध दाखले व प्रमाणपत्रे, महाडीबीटी योजनांचा लाभ, ग्रामविकास विभागाच्या सेवा अशा अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.


✴️ विविध विभागांमार्फत लाभांचे वितरण:

नगर परिषद चिखली, तालुका कृषी कार्यालय, सहायक निबंधक सहकारी संस्था, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोस्ट विभाग, एमएसईबी, जिल्हा उद्योग केंद्र, आरोग्य विभाग आणि इतर विभागांनी समन्वयाने काम करून हजारो लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला.


जनतेचा विश्वास हेच माझे बळ आहे. महायुती सरकारच्या प्रत्येक लोककल्याणकारी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, प्रशासन अधिक परिणामकारक करणे आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच माझी बांधिलकी आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेतही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन  सर्व नागरिकांना, करण्यात आले आहे.