*ग्रामीण प्रतिनिधी ,, महमदरफि मदार आदमपूरकर,,
मौजे खरब खंडगाव येथे आज दिनांक 01/08/2026 रोजी साहित्यरत्न साहित्य सम्राट साहित्याचा बादशहा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त क्रांतीचे प्रतिक असलेल्या लाल ध्वजाचे ध्वजारोहणाचा/झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ठिक 9.30 वाजता जुने गाव अण्णा भाऊ साठे सभागृह येथील ध्वजारोहण गावातील भूमिपुत्र आदर्श सेवानिवृत्त शिक्षक माजी सरपंच सन्माननीय पांडुरंगजी आनंदराव जाधव यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. आणि सकाळी ठिक 10.00 वाजता डॉ अण्णा भाऊ साठे स्मारक, साठे नगर नवी आबादी येथील ध्वजारोहण गावातील प्रथम नागरिक तथा प्रशासक सौ.सुलभाताई शिवाजीराव काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. आणि विशेष... डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनानी "लेखन प्रेरणा दिन" साजरा करा म्हणून घोषित केल्यामुळे. जि. प. के. प्राथमिक शाळा खरब खंडगाव येथील सर्व विध्यार्थी विध्यार्थीनी यांची हस्ताक्षर स्पर्धा घेऊन लेखन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. आणि आपल्या गावातील भूमिपुत्र आदर्श शिक्षक सन्माननीय पांडुरंग पा जाधव यांची सेवापुर्ती सन्मान सोहळा संपूर्ण गावकरी मंडळी च्या वतीने संपन्न झाला त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच सर्व सदस्य, सर्व माझी सरपंच सर्व माजी उपसरपंच सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन माजी चेअरमन आपल्या गावातील भूमिपुत्र मातंग समाजाची अस्मिता सन्माननीय API साहेब यांचीही शेवटी उपस्थिती लाभली.जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष माजी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष. माजी सर्व पोलीस पाटील.जि. प. कें. प्रा. शाळा खरब खंडगाव येथील मुख्यध्यापक सर्व शिक्षक वृंद.अंगणवाडी सेविका आशावर्कर, जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी व नागरिक सर्व समाज बांधव पुरुष -माता भगिनी. सर्वांचे जयंती मंडळाच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार..





Social Plugin