Ticker

6/recent/ticker-posts

बच्चूभाऊ कडू यांच्या मुख्य उपस्थितीत ‘प्रकल्पबाधित व रोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न.



मुन्ना येरेकार 

वणी स्थानिक प्रकल्पबाधितांच्या मागण्या आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी ‘प्रकल्पबाधित व रोजगार मेळावा’ शेतकरी मंदिर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मा. बच्चूभाऊ कडू यांची विशेष उपस्थिती होती.

प्रकल्पबाधितांना न्याय आणि रोजगारासाठी लढा तीव्र करणार: बच्चूभाऊ कडू

सभागृहात जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट केले की, विकासाच्या नावाखाली जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांवर आणि प्रकल्पबाधितांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळायलाच हवे, यासाठी शासन व प्रशासन स्तरावर तीव्र पाठपुरावा केला जाईल.


विविध संघटना व महिलांकडून निवेदने

कार्यक्रम प्रसंगी विविध स्थानिक प्रतिनिधी, महिला गट व प्रकल्पबाधित नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांसंदर्भात बच्चूभाऊ कडू यांना निवेदने सोपवली. यावर बोलताना त्यांनी सर्व प्रश्नांची दखल घेऊन ते लवकरात लवकर तडीस नेण्याचे आश्वासन दिले.

नागरिक व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या मेळाव्याला महिला, तरुण आणि स्थानिक नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण सभागृह खचून भरले होते. कार्यक्रमादरम्यान विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मेळाव्याच्या समाप्तीनंतर मा.श्री बच्चूभाऊ कडू यांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी पक्षाचे व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित पत्रकार म्हणून मुन्ना विठ्ठल येरेकार यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करत मा.श्री बच्चूभाऊ कडू यांनी उत्कृष्ठ कार्यक्रम नियोजनबद्दल श्री.अनिकेत चामाटे,सचिन राखुंडे तथा नवनिर्वाचित पत्रकार यांना स्वतंत भेट देऊन आपले अभिमत व्यक्त केले. या कार्यक्रमात श्री अनिकेत चामाटे, सचिन राखुंडे तथा मुन्ना विठ्ठल येरेकार यांनी या कार्यक्रमात खूप परिश्रम घेतले.