Ticker

6/recent/ticker-posts

खतगांव शाळेचे सहशिक्षक जिलानी येवतीकर गुरूजी सेवानिवृत्त



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम मुतन्याळ येथील रहिवासी तथा सौ.मंजुळाबाई माध्यमिक विद्यालयातील हिंदी विषयाचे सहशिक्षक जिलानी खाज्यामियाँ फारूकी (येवतीकर) हे प्रदीर्घ अध्यापन सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.मुतन्याळ गावातून सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबात जन्म घेऊन प्रारंभिक शैक्षणिक प्रवास त्यांचा उल्लेखनीय राहिला आहे.सौ.मंजुळाबाई माध्यमिक विद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन करीत असताना अक्षर लेखन आणि वाचायला येण्यासह शाळेत शिस्तबद्ध वागणूकीवर येवतीकर सरांचा नेहमी वचक असे.आवाज इतका दमदार होता की मुलांना शाळेत सर्वदूर कानी स्पष्ट पडत असे.शिकवण्याची हातोटी लक्षवेधी मुलांवर संस्कार करणारी होती.त्यामुळेच आज घडीला सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे चमकत आहेत.

शाळेतील सांस्कृतिक,शैक्षणिक, क्रीडाविषयक विविध महामानव जयंतीनिमित्त,लेखन,भाषण,घटक चाचणी,सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत परीक्षक म्हणून येवतीकर यांची वर्णी लागत असे.विद्यार्थीप्रिय,संस्कारशील,कडक अनुशासनाचे भोक्ते,स्पष्टवक्तेपणा,निर्भीड अशा अनेकविध गुणांनी परिपूर्ण असलेले गुणवंत सहशिक्षक निवृत्त झाल्याने आजी माजी विद्यार्थी,पालक,सहकारी शिक्षकांच्या मनामनात भावनांची गर्दी दाटून आलेली होती.

सेवानिवृत्त निमित्ताने संस्था सचिव,अध्यक्ष,विद्यमान पदाधिकारी,साई शिक्षण मंडळातील समस्त शिक्षक, शिक्षिका,पालक,फारूकी येवतीकर कुटुंबीय,मिञ परिवारासह मुतन्याळ,खतगांव,देगलूर गावातील प्रतिष्ठित गावकरी,आजी माजी विद्यार्थी अभिनंदनकरीत आरोग्यदायी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.