Ticker

6/recent/ticker-posts

व्यसनमुक्त युवा पिढी हीच सशक्त समाजाची खरी शक्ती =प्राचार्य डॉ.सुनील हेळकर


बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

आजच्या युवा पिढीमध्ये वाढत असलेल्या विविध प्रकारच्या व्यसनाविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. कारण आमली पदार्थाच्या सेवनामुळे व्यक्तींच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होत असतात. त्यामुळे युवा पिढीने व्यसनमुक्त राहणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त पिढी हीच समाजाची शक्ती असते असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त "व्यसनमुक्त विद्यार्थी व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान"या कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, प्रो.डॉ.आर.भोसले प्रा. हनुमंत निमसे, प्रा.नवनाथ लोखंडे प्रा. डॉ.अनिल जगताप, प्रा.पवार एल.के.प्रो.डॉ.संग्राम शिंदे, प्रा. गौरव जाधव प्रा.प्रदीप गायकवाड, श्री .शशिकांत पाटील इत्यादी उपस्थित होते.

       पुढे आपल्या भाषणात प्राचार्य डॉ.सुनील हेळकर म्हणाले,'विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचे आहारी न जाण्याचा तसेच आपले कुटुंब, मित्र आणि समाजातील व्यक्तींना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती केली पाहिजे कारण आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा जबाबदार  नागरिक आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबर उत्तम आरोग्य, चांगले संस्कार ,आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे.'व्यसनाला  नकार , निरोगी  जीवनाचा स्वीकार' असा विद्यार्थ्यांना संदेश प्रतीज्ञा म्हणून कार्यक्रम प्रसंगी देण्यात आला. अध्यक्ष भाषणात प्रा.डॉ.संजय  क्षीरसागर म्हणाले,'आमली पदार्थांच्या  सेवनामुळे आरोग्यावर परिणाम होऊन कुटुंबाचे आर्थिक नुकसान, सामाजिक प्रतिष्ठेला बाधा आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होते .त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.हनुमंत निमसे आणि प्रा.डॉ.किरण कुंभार यांनी प्रयत्न केले.सूत्रसंचालन प्रा. सुधीर धोंगडे यांनी केले.आभार प्रा.डॉ.हनुमंत निमसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.