Ticker

6/recent/ticker-posts

पाटील कॉलेज मध्ये ग्रंथालयशास्त्र विभागाच्या वतीने यूजर ओरिएंटेशन प्रोग्राम संपन्न



प्रतिनिधी:- प्रा डॉ विजय गायकवाड

रिसोड :- येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालयशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एन गायकवाड, मा.प्राचार्य डॉ जे बी देव्हडे (उशिकाअ) यांच्या मार्गदर्शनाखाली व (KRC) ग्रंथालयशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ विजय आर गायकवाड यांच्या नियोजनाखाली

नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी "यूजर ओरिएंटेशन प्रोग्राम" (ग्रंथालय उपभोक्ता प्रशिक्षण वर्ग) हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये NEP नुसार नवीन विद्यार्थ्यांनसाठी ग्रंथालयाद्वारे कोणकोणती पुस्तके, संदर्भ ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध आहेत, तसेच ग्रंथालयाद्वारे वेगवेगळ्या देण्यात येणाऱ्या सर्विसेस, त्यासोबत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथालयातील बसण्याची अद्यावत सुविधा, वर्तमानपत्र, मॅक्झिन, जर्नल्स तसेच विद्यार्थ्यांसाठी नेट वायफाय युक्त सुविधा, उपलब्ध असलेल्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकाची तोंड ओळख याबरोबरच ईतर अनेक बाबतीत मार्गदर्शन विभाग प्रमुख प्रा डॉ विजय गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदूम्न तायडे, सूत्रसंचालन ऋषिकेश सरकटे तर आभार ओम तायडे या विद्यार्थ्यांनी केले. तर हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश डहाळके, सुमेध मोरे, साहिल खैरे व विजय धांडे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.