Ticker

6/recent/ticker-posts

रक्षाविसर्जनाची राख नदित न टाकता राखेत वृक्षारोपण करूण नवयुवकांनी संकल्प घेऊन केला अनोखा उपक्रम.!!



मन्सूर शहा धोत्रा भ.चिखली.:-----

सविस्तर वुत्त असे  की,दि. ३१.७.२०२६ रोजी डोंगरशेवली येथिल कै.शिवाजी मोतीराम वानखेडे या ४० वर्षीय तरुणाचे निधन झाले . त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम दि ४.८.२०२६ रोजी बौद्ध स्मशानभूमि येथे करन्याचे  ठरले ,परंतु स्थानिक भिमशक्ति नवयुवक मंडल, पंच कमेटी व सर्व समाज बांधव डोंगरशेवली यांच्या संकल्पनेतुन रक्षा विसर्जनाची राख नदीत न  टाकता बौद्ध स्मशानभूमित पिंपळाचे  वृक्ष या राखेत लावुन अनोखा उपक्रम सादर करण्यात आला.

*झाडे लावा झाडे जगवा* हां सरकार का धोरण जणहिता करिता असल्याने आजच्या या रक्षा विसर्जन व वृक्षारोपण हां उपक्रम सर्वांसमोर आदर्श ठरेल ,अशि अपेक्षा समस्त गांवकरी कडून होत आहे.